विरभद्रेश बसवंती यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण
विरभद्रेश बसवंती म्हणजे सर्वगुणसंपन्न अष्टपैलू हिरा काळाने हिरावून न्यावा हे दुर्दैव- सुशीलकुमार शिंदे
.jpg)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कै.विरभद्रेश करबसप्पा बसवंती यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर ,आमदार सचिन कल्याणशेट्टी , रेणुक शिवाचार्य स्वामीजी , माजी आमदार नरसिंग मेंगजी , शिवसेना जिल्हाप्रमुख पुरोषात्तम बरडे , काँग्रेस शहराधक्ष्य प्रकाश वाले , माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थिती होती.
बसवंती घराणेमध्ये राजकीय नेतृत्व करण्यासाठी चढाओढ होती.मी लहान असताना एक बसवंती आमदारकी साठी उभे राहिले होते.मात्र नव्या पिढीच्या उगवता तारा सुसंस्कटूत होता.सर्वगुणसंपन्न असणारा काळाने हिरावून न्यावा हे दुर्दैव आहे.त्यांच्या आठवणीसाठी त्यांच्या पुतळ्याची उभारणी केली.उपेक्षितांना मदत करण्याची बसवंती यांचे विचार पुढे नेण्याची भूमिका कौतुकास्पद आहे.असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
मरावे परी कीर्ती रुपी उरावे , असे काम विरभद्रेश बसवंती यांनी केले आहे.जो जन्माला आहे त्याला मृत्यू तर आहेच शिवाय पुनर्जन्म देखील आहे.विधी लिखित कुणाला चुकले आहे.मात्र विरभद्रेश यांचे कार्य खूप महान आहे.ते आपल्या धर्मात जन्मले याचा अभिमान आहे असे मनोगत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केले.
लहान वयात सोलापूरकरांना सोडून गेले हे दुर्दैव.देशाच्या स्वतंत्र पूर्व काळात देशासाठी आहुती देणारा समाज म्हणजे लिंगायत समाज आहे.आमच्या सोलापुरातील गुलाबाची फुले आम्ही स्वतंत्र चळवळीसाठी वाहिली.आम्हाला सर्वधर्मसमभाव साठी देशाचे स्वतंत्र मिळाले.बसवंती यांनी माझ्याविरुद्ध मोर्चा काढला असं मी ऐकलं.माझ्या विरुद्ध मोर्चे काढण्याची मी सोयच ठेवली नाही.एकमेकांना समजून घेणं समजून घेणं हे महत्त्वाचं.असे ही सुशीलकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले ,निंबर्गी हे मराठीचे प्राध्यापक आहेत.अस्खलित शिकवतात.मला ही कधी कधी वाटत मी लहान व्हावा आणि त्यांचा विध्यार्थी व्हावा.मयुरेश मध्ये मला स्पार्क दिसते आहे.मुलगी डॉक्टर आहे.तीही तिच्या क्षेत्रात नाव कामवेल.मयुरेश तुला काहीही लागले तर आमच्याकडे ये.कलाकाराला सर्व माफ असते असे ही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजप माजी शहर चिटणीस अशोक निंबर्गा ,उदोजक बिपीनभाई पटेल , नगरसेवक चेतन नरोटे ,एल. बी.आव्हाळ , राजू हौशेट्टी , मयूर बसवंती , डॉ.ऍशोंर्या बसवंती ,श्रीशैल बनशेट्टी , विधीज्ञ गिरीश आवळे ,माजी नगरसेवक केदार उंबरजे , आनंद मुस्तारे ,महेश पाटील ,आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मोठ्या संख्येने विरभद्रेश बसवंती प्रेमी उपस्थित होते.
0 Comments