Hot Posts

6/recent/ticker-posts

स्पर्धात्मक परिक्षे शिवाय ध्येय प्राप्ती व प्रगती अशक्य- उपायुक्त धनराज पांडे

 स्पर्धात्मक परिक्षे शिवाय ध्येय प्राप्ती व प्रगती अशक्य- उपायुक्त धनराज पांडे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या 21 व्या शतकात स्पर्धात्मक परिक्षेला अत्यंत महत्व असुन त्या शिवाय ध्येय प्राप्ती व प्रगती करणे अशक्य असुन स्पर्धात्मक परिक्षा काळाची गरज झाली आहे असे उद् गार महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी काढले.  ते कॉ.एन.आर.बेरिया मेमोरियल ट्रस्ट तर्फे आयोजित स्कॉलरशिप परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.  कार्यक्रमात महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर, अ.भा.उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इलाहुद्दिन सिध्दीकी, पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सुनिल चव्हाण उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अ.रहेमान मौलाली पटेल यांनी कुराण पठण केले.  संस्थेचे अध्यक्ष ऍ़ड.समीरखान बेरिया यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करुन संस्थेने आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  

माजी महापौर यु.एन.बेरिया यांचे हस्ते प्रमुख अतिथींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्कॉलरशिप परिक्षेत सोलापूर शहर व जिल्हातुन मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमात उज्वल यश प्राप्त केलेल्या 84 विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते स्मृतिचिन्हे व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करुन स्पर्धात्मक परिक्षा उच्चतम पद प्राप्त करण्याचा योग्य मार्ग असुन भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परिक्षेत बसुन उत्तीर्ण होता यावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असे सांगितले.  

याप्रसंगी इलाहुद्दिन सिध्दीकी व सुनिल चव्हाण यांची समायोचितपर भाषणे झाली.  त्यांनी स्कॉलरशिप परिक्षेची फी कमी करणेचे आवाहन केले.  कार्यक्रमास  महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष फैय्याज शेख, उर्दू टिचर्स फेडरेशनचे अध्यक्ष फजल शेख, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जगताप मॅडम, मुख्याध्यापक जुबेर जानवाडकर, रेहाना हिरोली, आफरीन शेख, तबस्सुम शेख, नाजनीन कोरबु, शफक्कत शिलेदार आदी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करणेसाठी फुरकान पानगल, जुबेर मुजावर, अफरोज बागवान, मुजम्मील शेख, माजीद कलादगी, फरहान नल्लामंदु, युसुफ शेख यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इम्रान जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन गफुर अरब यांनी केले.




Reactions

Post a Comment

0 Comments