Hot Posts

6/recent/ticker-posts

युवासेनेचे थाळी,ताली बजाव आंदोलन

 युवासेनेचे थाळी,ताली बजाव आंदोलन


पेट्रोलपंपावर गुलाबपुष्प देऊन व मिठाई वाटुन अच्छे दिन आल्याचा आनंदोत्सव केला साजरा..


मोहोळ  (कटूसत्य वृत्त):-युवाहृदयसम्राट युवा सेना प्रमुख मा, नामदार  अदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व  युवा सेना सचिव वरूनजी सरदेसाई ,  सुरज चव्हाण, अमोल कीर्तिकर, रुपेश कदम , शिवसेना जिल्हाप्रमुख मा. गणेश (दादा) वानकर, युवासेना सहसचिव विपुलजी पिंगळे, शिवसेना जेष्ठनेते दिपक मेंबर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, नागेश वनकळसे, सर्व शिवसेना नगरसेवक यांच्या मार्गदर्शना खाली व युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांच्या नेतृत्वात  पेट्रोल,डिझेल,गॅस,खाद्यतेल,डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत.सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. म्हणून वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी थाळी,ताली बजाव वाजवुन आंदोलन आयोजीत केले होते. शहरातील भारत पेट्रोल पंप येथे इंधन भरण्यास आलेल्या नागरीकांना गुलाब पुष्प देऊन व मिठाई भरवुन अच्छे दिन आणल्या बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.. यावेळी केंद्र सरकारच्या महागाई धोरणाचा निषेध करत घोषणा देण्यात आल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख लखन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, नागेश वनकळसे, युवासेना शहरप्रमुख सचिन जाधव, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख, उपतालुकाप्रमुख संतोष चव्हाण, गणेश नाईक, जमिर शेख, उज्वल वाघमारे,  विक्रांत मांडवे, तेजस माळवदकर, मयुर सुर्यवंशी आदी युवासैनिक, शिवसैनिक उपस्थीत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments