अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा दार वाढला


राज्यातील सर्वाधिक दर सोलापुरातयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या वर्षात शेती व्यवसयावर सर्वाधिक प्रभाव राहिला आहे तो निसर्गाचा. यामुळे नुकसान अधिक झाले असून अवकाळी पावसाचा परिणाम सर्वच पिकांवर झालेला आहे.हंगामी पिकांचीही यामधून सुटका झालेली नाही. अवकाळीचा असा प्रतिकूल परिणाम असला तरी वाढत्या उन्हामुळे कलिंगड,लिंबू या पिकांना विक्रमी दर मिळत आहे. सध्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असल्याने लिंबू उत्पादकांना अच्छे दिन आले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल २५० रुपये किलो असा लिंबाला दर मिळत आहे. गेल्या १० वर्षात झाले नाही ते यंदाच्या उन्हाळ्यात घडले आहे. उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असली तरी लिंबू उत्पादकांना अशा परस्थितीमध्येही दिलासा मिळत आहे.राज्यातील सर्वाधिक दर सोलापुरातयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचेच लिंबू दाखल होत आहे. उत्पादनात घट झाल्याने आवकही अटोक्यात आहे. शिवाय लिंबाच्या आवकवरच दर ठरत आहे. गेल्या चार दिवसांपासून आवक घटल्याने लिंबाचे दर थेट २५० रुपयांवर गेले आहे. म्हणजेच एक लिंबू जवळपास १० रुपयांना मिळत आहे. हा राज्यातील सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी सांगितले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये उन्हात प्रचंड वाढ झाली आहे. शीतपेयासाठी लिंबाचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी किरकोळ विक्रेते येऊन बसत आहेत.अवकाळीमुळे मात्र उत्पादन घटलं अवकाळी पावसाची अवकृपा हंगामी पिकांवरही कायम आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे लिंबू परिपक्व होण्यापूर्वीच गळती झाली तर जमिनीवर पडलेली लिंब ही डागाळलेली आहेत. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. ऐन लिंबा बागा बहरात असताना वातावरणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता दर चांगला आहे पण माल कमी अशी अवस्था आहे. कधी कवडीमोल दरामुळे तर कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच असल्याचे शेतकरी नारायन साठे यांनी सांगितले आहे.आवक घटल्यास अणखी दरात वाढ गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५० रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय आतापर्यंत मागणी तेवढा पुरवठा झाला आहे. पण असेच ऊन वाढत गेले तर मागणीत वाढ आणि पुरवठ्यात कमी अशी स्थिती ओढावणार आहे. त्यामुळे भविष्यात लिंबाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे. यंदा मात्र, मुख्य पिकांमधून नाही पण हंगामी पिकांचा शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
0 Comments