Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्र शासनाने केलेल्या इंधन महागाई विरोधात काँग्रेस चे अंदोलन

केंद्र शासनाने केलेल्या इंधन महागाई विरोधात काँग्रेस चे अंदोलन

          मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर केंद्र शासनाने केलेल्या महागाई इंधन दरवाढीबाबत मोहोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार घालून पेट्रोल पंपावर निदर्शने केली व तिथून मोर्चा काढून मोहोळ तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

          यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश आप्पा शिवपुजे महाराज, मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पवार, मोहोळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शाहीर हावळे, वरिष्ठ जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाळासाहेब तांबोळी, मोहोळ तालुका काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धाराम पवार, ओबीसी सेल चे काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांतीलाल राऊत, राजेंद्र सर्जे, किसान सेलचे अध्यक्ष दाजीसाहेब कोकाटे, ओबीसीचे बिरासाहेब खरात नामदेव खांडेकर, आनंद पाटील, तालुका काँग्रेस संघटक महेश नेटके, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश जवंजाळ, अपंग सेल किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम चव्हाण, सर ज्ञानेश्वर कदम, अॅड राम शिंदे, महिला रतन ताई कसबे, राणीताई नेटके, यशोदा लोखंडे, लक्ष्मी भारत सुतार, मीना रणदिवे, धनश्री मोठे, जगन्नाथ होनमाने, कल्याण माने, शुभम खंदारे, सुनील कोळेकर, ऋषिकेश कॉल, लाल निखिल, लोणार गणेश मोठे, शंकर मोठे, अरबाज शेख, अमजद शेख, आप्पा हांडे, विठ्ठल दमन चव्हाण, मोहोळ शहर उपाध्यक्ष अमोल मोरे, मोहोळ शहर उपाध्यक्ष राहुल कुर्ड, कृष्णदेव वाघमोडे, श्रीरंग पाटील, राजेंद्र घाडगे, हरिभाऊ गायकवाड, आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरात घोषणा देण्यात आला. यावेळेस बाल कार्यकर्ता सूर्या पवार हे उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments