Hot Posts

6/recent/ticker-posts

साडी चोळी हे महिलांच्या अस्मितेचे प्रतिक आहे,घरावर गुढी म्हणून लटकवण्याचं नव्हे..

साडी चोळी हे महिलांच्या अस्मितेचे प्रतिक आहे,घरावर गुढी म्हणून लटकवण्याचं नव्हे..
साडी चोळी ची गुढी उभारणे हे फक्त महाराष्ट्रातच का पहायला मिळते. ?
महाराष्ट्रात मोठ्यप्रमाणावर गुढीपाडवा साजरा करण्यात येतो आम्हीही लहान पणापासून साजरा करत आलो आहोत गुढीपाडवा हिंदू नवं वर्ष म्हणुन साजरा करण्यात येतो मग तो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश विशेष करून इथपर्यंतच मर्यादित कसा अखंड भारतात साजरा का करण्यात येत नाही.हिंदू धर्मात कलश घट वर्षभर उभा शुभ मानला जातो मग या दिवशी तो उलटा काठीवर टांगुन का ठेवला जातो.? आपली संस्कृती ही महिलांचा सन्मान करणारी आहे मग या दिवशी महिलांची साडी त्या गुढीवर काठीवर का टागळी जाते? राम आयोध्या मध्ये परत आल्यामुळे जर आनंद उत्सव म्हणून गुढी उभारण्यात आली तर ती भगवी पताका का नाही किंवा आयोध्या मध्ये साडी चोळीच्या गुढ्या का लावल्या जात नाहीत?
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचे सण मनुवादी वैदिक परंपरेने भेसळ करून तर दिले नाहीत ना आम्हाला साजरे करण्यासाठी...गुढीपाडव्याला घरच्या साडी चोळी लुगड्यात विकतचा बांबू घालून घरादारावर उलटा तांब्या लटकवून आई बायकोची आणि बहिणीची इज्जत घालू नका.कळू द्या सर्व मनुवाद्यांना आता त्यांची गुलामगिरी कोणीही करणार नाही त्यांनी खूप छेळलय आमच्या महापुरुषांना गुडी नाहीतर भगवी पताका करू घरी उभी, देऊ जुन्या गोष्टी ना मुठ माती बहूजनांनो आणि मराठ्यांनो खूप झाली मनुवाद्यांची गुलामी गुढी उभारायची,ती म्हणजे शिवस्वराज्याचे धाकल्या धन्यानी जिच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आशा एक पताकी भगव्या ध्वजाची गुढी उभारु अजून किती पिढ्या आपण आपल्या घरातील महिलांची साडी चोळी गुढीपाडव्यास दारावर टोकराला टांगणार ? शिवस्वराज्य देणाऱ्या पताका ध्वज हीच भारतीयांची गुढी..
नको बांधू बायको ची साडी ।
नको लावू उलटा तांब्याची मढी। 
भगवी पताका हीच आपली गुढी।

गुढी या शब्दाचा चा अर्थ पताका होय..
साडी चोळी बांबू उलटा तांब्या मयतालाच लागतात लिंबाच्या फांद्या तिरंडीला बांधतो एरंडाची काठी हे सर्व गुढीला का वापरतात यांचे उत्तर आता पर्यत कुणीही दिले नाहीगुढीपाडव्याला  साडी घरा दारावर लटविणे आणि गुढीपाडवा किती वर्षाआधी साजरा केला होता आणि कुणी केला होतो, त्यांनी साडी चोळी लिंबाच्या फाद्या वापरल्या होत्या का..?
उलटा गडवा, साडीचोळी घरावर टांगणे ,मरणात वापरणारा बासा वापरणे हे कितीपत योग्य वाटते त्यापेक्षा भगवाच ध्वज वापरणार? काय हरकत आहे.?आई ची साडी टांगणाऱ्यांनो या वर्षी बापाचा धोतर टांगून पाहा अधिक पुण्य मिळेल.तोडली आम्ही बंधनं,गाडल्या आम्ही रूढी परंपरा,आम्ही आई बहिणीची,बायकोची साडी चोळी नाही टांगणार घरा दारावर; उभारू फक्त भगवी पताका गुढी..

भगवी पताका हीच आमुची खरी गुढी,
आता नाही लटकवीणार घरावर साडी..।

अशुभ आहे हो तो उलटा तांब्या,
मयतालाच लागतात कडुनिंबाच्या फांद्या..।।

तिरंडीला बांधतो एरंडाची काठी,
सोडा माय बाप हो हे सर्व..।।।

 आता तरी वैचारिक विचार करा आणि परिवर्तन घडवा..प्रत्येक घरावर असावी पताका गुढी..पाडव्याच्या दिवसी माझ्या घरावर फक्त आणि फक्त भगवा ध्वजच फडकतो आमची गुढी पताका ध्वज..घरावर भगवा पताका ध्वज उभारुन हाच आपला गुढीपाडवा म्हणुन समाजाने साजरा करावा.मी माझ्या घरावर भगव्या झेंड्याची (पताका) गुढी उभारणार आणि तुम्ही...
छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक नाकारतात आणि छत्रपती संभाजी राजांना धर्मासाठी बलीदान दिले असे म्हणतात हा लोचा काही कळतंच नाही ओ..ते मनुवादी लोक आपल्याला धर्मरक्षक शंभूराजे सांगतील,आपण मात्र शिवस्वराज्यरक्षक शंभूराजे लक्षात ठेवायचे..
 *जय शंभूराजे..🚩*
✍️शिवश्री संतोष शकूंतला 
      आत्माराम बादाडे 
जिल्हाध्यक्ष पुणे 9689446003 
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
      महाराष्ट्र राज्य..
Reactions

Post a Comment

0 Comments