Hot Posts

6/recent/ticker-posts

कन्हेरगांव ग्रामस्थांकडून आ.संजयमामा शिंदे यांचा सत्कार

कन्हेरगांव ग्रामस्थांकडून आ.संजयमामा शिंदे यांचा सत्कार

          टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): कन्हेरगांव विकास सेवा सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत माजी सरपंच लिंबाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली कन्हेरसिद्ध समन्यायी सहकार विकास पॕनेलने १३/० ने विजय मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले.निवडून आलेल्या संचालक मंडळाने आ.संजयमामा शिंदे यांची भेट घेत सत्कार केला.आ.संजयमामा यांचा सत्कार कन्हेरगांवचे मा.उपसरपंच शरद आप्पा डोके यांचेहस्ते करण्यात आला.

          यावेळी माजी.उपसरपंच दादासाहेब खोचरे, दिंगबर केदार, अमित खोचरे, नवनिर्वाचित संचालक मा.उपसरपंच दत्ताञय माने,रामलिंग खोचरे, उमेश डोके, दत्ताञय डोके, मारुती काशीद,जयवंत पाटिल, महावीर मोरे,विशाल भरगंडे, गणेश पाणिपुरवठा संंस्थेचे सचिव शंकर गोसावी,संचालक किरण खोचरे, दत्ताञय मोरे, मा.ग्रा.प.सदस्य अर्जून भरगंडे,विलास डोके (पुढारी ),मोहन पाटिल,मंगेश ताटे,तुषार काशिद,ईश्वर शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी आ.संजयमामा यांनी विजयी संचालकांना शुभेच्छा दिल्या

Reactions

Post a Comment

0 Comments