Hot Posts

6/recent/ticker-posts

राजन पाटील यांची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही, त्यांच्या नव्या राजकीय जबाबदारीसाठी मी आग्रही : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

राजन पाटील यांची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही, त्यांच्या नव्या राजकीय जबाबदारीसाठी मी आग्रही : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

           मोहोळ (कटूसत्य वृत्त) : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एक मे पासून राहिलेला ऊस आणणाऱ्या कारखान्यासाठी रिकवरी लॉस म्हणून दोनशे रुपये तर ट्रान्सपोर्ट साठीपन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी पर किलोमीटर पाच रुपये असा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्ट चा खर्च हा शेतकऱ्यांच्या एफआरपी मधून खर्च होतो म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला. साखर आयुक्तांना सूचना देण्यात आले आहेत की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या त्या भागांमध्ये तुमच्या विभागाने लक्ष देऊन ज्या भागातील ऊस जा कारखान्याला पाठवूनं सोयीचे असेल तो कारखाना तोपर्यंत बंद होऊ द्यायचा नाही. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक काडं देखील ऊस शिल्लक राहणार नाही असा शब्द मी देतो असे  उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले.

           मोहोळ मतदारसंघातील नव्या सिंचन योजनासाठी माजी आमदार राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांना बोलावून मंत्रालयात जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्‍चितपणे प्रयत्न केला जाईल. तसेच अनगर आणि मोहोळ नगरपंचायतीच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी चालू आर्थिक वर्षातील निधी वाटपाच्या तरतुदीतून प्रत्येकी पाच कोटी तर पुढील आर्थिक वर्षात आणखी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली.

           मतदारसंघाच्या पुनर्रचनेत झाल्यामुळे मोहोळ सारखा झपाट्याने विकासाच्या दिशेने जाणारा मतदारसंघ आरक्षित झाला यामुळे माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याला थांबावे लागले. तरीही त्यांनी निवडून दिलेल्या आ.यशवंत माने यांनी सुचविलेली कामे त्वरित होत असून निधीबद्दल देखील कमतरता भासू दिली नाही. लवकरच राजन पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याला कोणती नवी जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करता येईल यासाठी मी स्वतः पवार साहेबांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. पवार साहेबांवर प्रेम करणारा इतका विराट जनसमुदाय पाहून या जनसमुदायातील प्रत्येकाच्या सर्वांगीण हितासाठी मी निश्चितपणे खंबीरपणे पाठीमागे उभा असेन.

           अनगर नगरपंचायतीच्या स्थापने निमित्त मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्या वतीने कृतज्ञता आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ना.अजितदादा पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री ना धनंजय मुंडे,राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे,महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, राजन पाटील,जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,आ.बबनदादा शिंदे,आ.यशवंत माने,आ.निलेश लंके,आ.संजय शिंदे, आ.अमरसिंह पंडीत,आ.राहुल पाटील,दीपक सांळुखे,बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, कल्याणराव काळे, संतोष वाबळे इत्यादी उपस्थित होते.

           यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणाले की रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्यानंतरया देशात कर्जमाफीचा दुसरे उदाहरण केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांनी २००८ ला शेतक त्यांची कर्ज माफी केली.

           नवनिर्माण म्हणतं हनुमान चालीसा मस्जीद समोर वाजवू तर नवनीत म्हणतायेत हनुमान चालीसा मातोश्री समोर वाजवु हनुमान चालीसा ही मस्जीद आणि मातोश्री समोर मनाची नाही हनुमान समोर हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी असतं. हिच हनुमान चालीसा तुम्ही कुठं भी वाचु लागलात  संकट मोचक कधी संकट म्हणुन  तुमच्या  पाठीमागं लगल मेळच बसायचा नाही. ही बाब यांच्या कधी ध्यानात येणार ? अनगर हे गाव ग्रामपंचायत असल्यापासुन विकासाने समृद्ध असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. आता नगरपंचायतीची स्थापना झाल्यामुळे यापुढील काळातही या भागातील विकासात्मक वाटचाल अशीच गौरवास्पद रित्या सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. राजन पाटील हे माझे मामा आहेत त्यामुळे आम्हा सर्व भाच्यांना अशा कर्तबगार मामांचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे. या पुढील काळातही अनगरकर पाटील परिवाराशी असलेली आपुलकीची अन स्नेहाची नाळ कायम राहील अशी भावनिक साद यावेळी मुंडे यांनी घातली.

           यावेळी प्रास्ताविक करताना माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत करून अजित पवार यांनी कोबिर सारख्या अडचणीच्या काळात सुद्धा मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी भरीव निधी दिला आहे.  आजवरच्या मोहोळ मतदार संघाच्या विकासात्मक वाटचालीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल भावंडे कृतज्ञता व्यक्त केली.

           राजन पाटील यांनी नव्या सिंचन योजना मंजूर करून त्यांना निधी देण्याची मागणी करण्याबरोबर अनगर येथे स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालयाची उभारणी तसेच मोहोळ आणि अनगर नगरपंचायतीच्या अद्यावत इमारतीसाठी प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. गेल्या तीन पिढ्यांपासून अनगरकर -पाटील परिवार हा शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेला परिवार असून यापुढील काळातही पवार कुटुंबीयांकडून मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

           या कृतज्ञता व शेतकरी मेळावा साठी उपस्थित दूध संघाचे व्हा. चेअरमन दिपक माळी, बाजार समिती सभापती अस्लम चौधरी, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, युवक अध्यक्ष राहुल मोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, दत्तात्रय खवळे, नागेश साठे, सभापती रत्नमाला पोतदार, सरचिटणीस प्रशांत बचुटे, सिंधुताई वाघमारे,यशोदा कांबळे, जावेद बागवान, हनुमंत पोटरे, सतीश भोसले, भारत सूतकर, युवक तालुकाध्यक्ष राहुल मोरे, अनिल कादे, प्रशांत बचुटे, रामदास चवरे, शुक्राचार्य हावळे, माजी सभापती रत्नमाला पोतदार, महेश पवार, इत्यादीसह मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे  पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

           दोन-तीन दिवसांमध्ये काय चमत्कार घडू शकतो ते फक्त राजन मालक दाखवू शकतात शेवटी जनते चं प्रेम लोकांचा भरभक्कम पाठिंबा जनतेचा नेतृत्वावर नेतृत्वाचा जनतेवर असणारा विश्वास घ्याच्यातुनच ते खरं उभ राहत हे काय वेड्या गबळ्याचं काम नाही. दोन दिवसात मेळाव्याचं नियोजन करून यशस्वी केल्याचं कौतुक उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments