Hot Posts

6/recent/ticker-posts

बाजार समितीत नवीन ज्वारीची आवक सुरू कांदा मार्केटही अजूनही अस्थिर

बाजार समितीत नवीन ज्वारीची आवक सुरू कांदा मार्केटही अजूनही अस्थिर

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आठवड्यात ज्वारीच्या भावात प्रति क्विंटलला दोनशे रुपयांनी घट झाली.कांदा मार्केटही अजूनही अस्थिर असल्याने भाव गडगडलेलेच आहे.बाजार समितीत नवीन ज्वारीची आवक सुरू आहे. ५ एप्रिल रोजी ज्वारीचा भावात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.सध्या ज्वारीचे भाव १ हजार ८५५ ते २ हजार ६०५ रुपये इतके आहेत. बाजार समितीत दररोज ७० ते ८० क्विंटल ज्वारीची आवक आहे.सुरू गुढीपाडव्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल विक्रीसणतात.गेल्या आठवड्यात ज्वारीचे भाव प्रति क्विंटल १ हजार ८२५ ते २ हजार ३८२ रुपये होते. त्यामुळे ज्वारीची वाढल्याचे आवक व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्राहक याच काळात वर्षभराचे धान्य साठवून ठेवत असल्याने ज्वारीला चांगली मागणी आहे. त्यामुळे भाव वधारला आहे.हरभऱ्याचे भाव वाढले आहेत. सध्या अण्णीगिरी हरभरा ४ हजार ४०० ते ४ हजार ६७५, तर साधा हरभरा ४ हजार ते ४ हजार २०० ने विकला जात आहे. शेतकऱ्यांकडून गव्हाची आवक ४० ते ५० क्विंटल होत आहे. मात्र, आता भाव स्थिर आहेत. सोयाबीनचा भाव अजूनही तेजीत आहे. 

बाजारात सोयाबीनची आवकही वाढली आहे. सध्या सोयाबीन ५००५ ते ७ हजार ३५० रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे.गहू प्रति क्विंटल १ हजार ६०० ते २ हजार २०० रुपये विकला जात आहे. बाजारात २५९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. २६ एप्रिल रोजी सोयाबीनचा भाव ६ हजार ९०० ते ७ हजार २५० इतका होता. २९८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments