राज्यकर्ते ओबीसींचे आरक्षण काढतील त्यांच्या खुर्च्या काढून घेऊ - संयोजक रमेश बारसकर
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र व राज्यातील सरकार वेळकाढूपणा करत असल्यामुळे दोन्ही शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ज्योतीक्रांती परिषदेच्या वतीने राज्यव्यापी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, देशातील धनदांडग्या लोकांनी याला विरोध केला. भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे क्रांतिकारी लढा उभारला त्याच प्रमाणे ओबीसी बांधवांना गेलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी लढा उभा करावा लागेल. ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.यावेळी बोलताना जुबेर शेख म्हणाले की, ओबीसी समाजाची वज्रमूठ आवळल्याशिवाय आरक्षण मिळणे शक्य नाही याचे भान आता सर्वच ओबीसी बांधवांनी ठेवायला हवे.
यावेळी मारूती रोकडे, निलंगा नगरपरिषदेचे सभापती शरद पेठकर,बाळासाहेब स्वामी, नगरसेवक अविनाश माळी, महादेव माळी, कार्याध्यक्ष अतुल क्षिरसागर, प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,सुलतान पटेल, महेश माळी, महेश म्हेत्रे, लोमेश काळे, सागर अष्टुळ, विकी घुगे, बाळासाहेब चिकलकर, विशाल शिंगाडे, संजय शितोळे, नितिन माळी,नागनाथ म्हेत्रे, धनाजी म्हेत्रे,सोमा माळी, बाळासाहेब माळी, श्रीकांत गाढवे,बाळू भाले,सिद्धार्थ एकमल्ले आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments