जि.प.शाळा उपळाई खु येथील मुलांची प्रगती पाहून केले समाधान व्यक्त ; शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांची शाळेला अचानक भेट
.png)
माढा (कटूसत्य वृत्त):- जि.प.शाळा उपळाई खुर्द येथे अचानक प्रवेश करुन वर्गाची तपासणी सुरु केली. मुलांची तयारी पाहून शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी समाधान व्यक्त केले.
सर्व परिसर स्वच्छता कुंड्यातील झाडांची लागवड पाहिले लगेच शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेतली कोविडच्या काळात राबवलेले उपक्रम झाडाखाली शाळा तंबाखू मुक्त शाळा कोविड जनजागृती गृहभेटीतील अध्यापन स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम अध्ययन स्तर निश्चित करने व कृती आराखडा तयार करून उपचारात्मक अध्यापन प्रभावीपणे राबवणे शब्द महोत्सव इतर ही उपक्रम पाहून आनंद व्यक्त केला.
मुलांचे वाचन लेखन गणिती क्रिया प्रत्यक्ष पाहिले मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.मुले साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक देत होती. मनमोकळेपणाने संवाद साधत होती .मुलांची गुणवत्ता पाहून खूपच आनंद झाला व म्हणाले की मी पहिल्यांदाच एवढे चांगले शैक्षणिक वातावरण पाहतोय. उपळाई बुद्रुक केंद्राचा गुणवत्तेचा आदर्श पँटर्न खूप चांगला आहे.
आणखी गतिमान होण्यासाठी मार्गदर्शन केले शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांना यांच्या कामाचे कौतुक केले मुख्याध्यापक विजय काळे यांनी आभार मानले.
0 Comments