सोलापूर-अक्कलकोट महामार्गाच्या भूसंपादनास मंजुरी
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयच्या वतीने सर्वात महत्त्वाचा असलेला सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर एक्सप्रेसवेच्या एकूण अंतरातील बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या 151 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-हैदराबाद-चेन्नई महामार्ग सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जिल्ह्यातून जात असून, हा महामार्ग बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातून जाणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
उत्तर भारत दक्षिण भारत हे अंतर एकूण पाच तासांनी कमी होऊन 400 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. चेन्नई ते सुरत या महत्वाच्या दोन बंदरांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट येथून जवळपास 61 गावांमधून 151 किलोमीटर महामार्ग जात असून येथील जमिनीचे संपादन होणार असल्याचे यावेळी महामार्ग आणि भूसंपादन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments