Hot Posts

6/recent/ticker-posts

कोव्हीड काळात रुग्णालयाची गरज होती तर पंतप्रधानानी थाळ्या, घंटा वाजवुन दिवे लावायले सांगितले-आ. प्रणिती शिंदेची टिका

कोव्हीड काळात रुग्णालयाची गरज होती तर पंतप्रधानानी थाळ्या, घंटा वाजवुन दिवे लावायले सांगितले-आ. प्रणिती शिंदेची टिका

माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयात महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा आ.प्रणिती शिंदे च्या हस्ते शुभारंभ

          माढा (कटूसत्य वृत्त):- कोव्हीड च्या काळात दवाखाने  ऑक्सिजन, व्हेंटिलिटर ची संख्या वाढवायला  पाहिजी होती.पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळ्या- घंटी  वाजवायला आणि दिवे लावायला जनतेने सांगितले.सध्या भोंग्याचा  मुद्या सोडुन  दुसरं काही सुचत नाही. जात पात धर्मात अडकलेत असे वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेनी केले आहे.

          माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा शुभारंभ आ.प्रणिती शिंदेच्या हस्ते झाला यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी स्व.स.म.गणपतराव साठे,स्व.विलासराव देशमुख,याच्या प्रतिमेचे पुजन केले.अध्यक्षस्थानी माजी आ.धनाजीराव साठे हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला.

          आ.शिदे बोलताना पुढे म्हणाल्या, कोव्हीड च्या काळात दवाखाने ऑक्सिजन,व्हेंटिलिटर वाढवायला पाहिजे होते.पण आपल्या  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना थाळ्या- घंटी वाजवायला आणि दिवे लावायला सांगितले.आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांचे जीव गेले.एकीकडे गॅस-पेट्रोल भाव वाढ सुरु असताना  दुसरीकडे मात्र  राज्यात भोंग्याच्या मुद्या  शिवाय दुसरं काही नेते मंडळीनी  सुचत नाही.मोठी आव्हाने देशा सह राज्यासमोर असताना जात पात धर्मात अडकलेत. गोरगरिबांच्या प्रश्नी बोलायला कुणी तयार नाही ही बाब चुकीची आहे. भाजप पक्ष हा फक्त अदानी अंबानी साठी असल्याचे सिध्द झालंय.मित्रप्रेम रुग्णालयाच्या कामकाजाचे कौतुक करुन रुग्णालयासाठी आगामी काळात आवश्यक मदत मिळवुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

          प्रास्ताविकातुन दादासाहेब साठे यांनी रूग्णालयाच्या कामकाजाचा आढावा मांडुन कारडिओ लाजिस्ट रुग्णांसाठी रुग्णवाहिका  तसेच किडनीचा आजार असलेल्या रुग्णांसाठी डायलेसीस मशिन उपलब्ध करुन   देण्याची मागणी आ.शिंदे यांच्याकडे केली.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.विकास मस्के म्हणाले  कोरोना काळात गोरगरिब रुग्णांना हे रुग्णालय वरदान ठरले असुन रुग्ण वाचल्याचे भाग्य लाभल्याचे सांगत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे यांनी रुग्णालयात  नर्सिग कोर्स च्या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी मांडली.यावेळी माजी आ.धनाजी साठे,शाहीन शेख,अॅड.बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

          या प्रसंगी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा शाहिन शेख,शिरीष पाटील,दिपक देशमुख,अॅड.बाळासाहेब पाटील,डाॅ.शिवाजी थोरात,डाॅ.विकास मस्के,ज्ञानेश्वर वाघ,सौदागर जाधव,संतोष पाटील,राहुल पाटील,सुरेश हळवळे,उत्तम रणदिवे,जहीर मणेर,डाॅ.स्नेहा गायकवाड,डाॅ.सुजीत सांळुखे यांचेसह नगरसेवक,रुग्णालयाचे स्टाॅफ सह शहरवासिय उपस्थित होते.लक्ष्मण राऊत यांनी सुत्रसंचलन तर आभार विजयसिंह पाटील यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments