पीक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला द्या कृषी विभागाचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 13, 2022

पीक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला द्या कृषी विभागाचे आवाहन

 पीक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला द्या
कृषी विभागाचे आवाहन

 


                 सोलापूर (कटूसत्य वृत्त): प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये सोलापूर जिल्हयातील शेतक-यांनी गहू (बागा.). रब्बी ज्वारी (बागा), रब्बी ज्वारी (जिरा.), हरभरा, उ. भूईमुग व र.कांदा या अधिसुचित पिकांसाठी विमा हप्ता भरून सहभाग नोंदविलेला आहे. सोलापूर जिल्हयामध्ये माहे एप्रिल २०२२ मध्ये बिगर मोसमी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने अधिसुचित पिकांचे काढणी पश्चात पीक नुकसान झाले असल्यास पीक नुकसानीच्या पूर्वसुचना ७२ तासाच्या आत ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने विमा कंपनीस सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

            रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कापणी/ काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवडयांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे आधारे पीक विमा नुकसान भरपाई मिळणेबाबत तरतूद आहे.

         काढणी पश्चात नुकसान- ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी/ काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवडयांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामेकरुन निकषांचे अधिन राहुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

         काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीम अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स अँप (Crop Insurance App/ संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/ कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक आहे.

           जिल्हयात रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये योजना आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल ईन्शु.कं.लि., आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड हाउस,४१४, वीर सावरकर मार्ग, सिध्दीविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, दुरध्वनी क्र.१८००१०३७७१२ मुंबई ४०००२५, ई मेल customersupportba@iciclombard.com, टोल फ्री. 18001037712 या विमा कंपनीकडुन राबविण्यात येत आहे.

            अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे श्री शिंदे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages