Hot Posts

6/recent/ticker-posts

आणीबाणी भारनियमन उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

 आणीबाणी भारनियमन उठले शेतकऱ्यांच्या मुळावर


मागील तीन दिवसांपासून शेतीपंपासाठी केवळ पाच तासच वीज पुरवठा

सोलापूर (सचिन जाधव):- महावितरणच्यावतीने सध्या इमर्जन्सी भारनियमन केले जात आहे. पण हे भारनियमन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतीपंपासाठी मागील दोन दिवसांपासून केवळ पाच तासच वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या इमर्जन्सी भारनियमनाने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. महावितरणच्यावतीने शेतीपंपासाठी दिवसा व रात्रीही आठ तास वीज पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन दिवसांपासून शेतीपंपासाठी केवळ पाच तासच वीज पुरवठा केला जात आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढलेल्या वीज मागणी चा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्याच मुळावर उठला आहे. घरगुती ग्राहकांना नियमित वीज देण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना बळीचा बकरा केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आठ तास विजेमध्ये सुद्धा भारनियमन करून त्यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात आहे. मागील महिन्यात वीज बिल वसुलीसाठी महावितरणने तगादा लावला होता. थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांनी विजेची बिले ही भरली आहेत. मात्र, त्यावेळी विधिमंडळात झालेल्या निर्णयानंतर वसुलीची मोहीम थंडावली होती.शेतकऱ्यांवरच अन्याय का विजेची मागणी वाढल्यामुळे भारनियमन केले जात आहे. मात्र भारनियमन करत असताना शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे. भारनियमनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. उन्हाळ्यात ज्यावेळी पिकांना पाण्याची गरज असते त्या वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. भारनियमन केल्यामुळे पिके पाण्याविना जळू लागली आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेले शेतीपंपाचे भारनियमन रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments