प्रद्युम कांबळेच्या मारेकर्यांना फाशी द्या - क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजही पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात उच्चनिचता जोपासली जात आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात वारजे माळेवाडी भागात वडारवाडी मधील गोखले नगर १६ येथील अनाथ, दलित मातंग समाजातील प्रद्युम कांबळे याची प्रेम प्रकरणातून दि. १६/३/२०२२ रोजी अत्यंत क्रूरपणे कट रचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सदर निवेदन ई-मेल द्वारे पाठवण्यात आले.
या निवेदना मार्फत महाराष्ट्र शासनाकडे या घटनेसंदर्भात मागणी करण्यात आली की प्रद्युम कांबळे च्या सर्व मारेकऱ्यावर खून, मोक्का आणि ॲट्रोसिट ॲक्ट मधील तरतूदी नुसार गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा होण्यासाठी या निंदनीय व अमानवीय घटनेची C.I.D. मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, पुणे पोलिस आयुक्ता यांच्या कडून प्रद्युम कांबळे याच्या घरच्यांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे, आरोपीच्या नात्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमधील ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना सहकार्य केले अशा पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावरती ॲट्रोसिट ॲक्ट मधील तरतूदी नुसार गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.
या सर्व मागण्यांचा विचार करून तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतीवीर लहुजी शक्ती सेने च्या वतीने देण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष किसन नाना पाटोळे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद भाऊ कांबळे, शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, शहर युवक उपाध्यक्ष संजय रणदिवे, शहर युवक कार्याध्यक्ष सोनू उर्फ श्रीनिवास देवकुळे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापुजी गायकवाड, कलाकार सेनेचे जिल्हाध्यक्ष अतिश पाटोळे, महिला शहराध्यक्ष संगीता कांबळे, जांबमुनी मध्यवर्ती रथोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रविण वाडे रोहन कांबळे,आकाश पाटोळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment