उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींसमोरच व्यासपीठावरून राज्यपालांना सुनावलं!..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, March 6, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींसमोरच व्यासपीठावरून राज्यपालांना सुनावलं!..!

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींसमोरच व्यासपीठावरून राज्यपालांना सुनावलं!..!
पुणे (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींसमोरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याविषयी सुनावलं. राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत असल्याची तक्रार अजितदादा पवारांनी पंतप्रधानांकडे केली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यासपीठावरून याचा थेट उल्लेख न करता राज्यपालांना सुनावले. अजितदादा पवार म्हणाले, राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत केली जात आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला पटलेल्या नाहीत, मान्य नाहीत. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, जिजाऊं मासाहेब व
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य स्थापन केलं. सावित्रीमाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी सत्यशोधक विचार माडंले. त्यांच्या विचारांचा मोठा वारसा आहे. त्याचे पालन केले पाहिजे. याबद्दल मनात आकस न ठेवता त्यांचा वासरा पुढे न्यायचा आहे. तसेच विकास कामांत राजकारण न करता महामानवांचे विचार पुढे न्यायचे आहेत, असे अजितदादा पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages