Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूरात अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पावर लाईव्ह "बजेट पे चर्चा" संपन्न

 पंढरपूरात अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पावर लाईव्ह "बजेट पे चर्चा" संपन्न

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथील युवा नेते, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सन२०२२-२३ अर्थसंकल्प DVP मल्टिप्लेक्स, पंढरपूर येथे लाईव्ह दाखवून विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या उपस्थित 'बजेट पे चर्चा' करण्यात आली. 


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्प बजेट दाखवून सादर केलेल्या बजेटवर फायदे आणि तोटे यादोन्ही बाजूंवर शहरातील राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यापार, डाॅक्टर, पत्रकारिता, बँकिंग, बांधकाम वेगवेगळ्या विभागातील तज्ञांना आपले विचार मांडण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रात सरकारने सादर केलेल्या बजेट बाबत विभागवार सविस्तर अशी "बजेट पे चर्चा'' करून मविआ सरकारने काही क्षेत्रांवर उत्तम प्रकारे अर्थसंकल्प मांडला तर काही क्षेत्रातील विभागांवर आणखी विचार करायला हवा होता असा चर्चातून संवाद घडून आला.


यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाषदादा भोसले, कर सल्लागार विश्वंभर पाटील, रणजीत भोसले, प्रा.तुकाराम मस्के, जनता बँकेचे मॅनेजर भातलवंडे, आर.बी जाधव, आर्किटेक्चर सोमनाथ कराळे, राजेंद्र नरसाळे, भाजपच्या नेत्या डाॅ.प्राजक्ता बेणारे, राष्ट्रवादीच्या नेत्या आशाताई बागल, विद्यार्थीनी अबोली कोळी, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, पतसंस्था चेअरमन उमेश सासवडकर, सनराईजचे अध्यक्ष समाधान गाजरे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


राज्याचे अर्थसंकल्प हे जनसामान्यांपर्यंत पोचविणे आणि बजेट हे सर्वसामान्यांना समजावे याकरिता गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील तज्ञ मान्यवरांच्या उपस्थित बजेट पे चर्चा करण्यात आली. बजेटमध्ये पंढरपूर तिर्थक्षेत्रासाठी निधी दिला परंतू प्रतिनिधीनी त्याचा पाठपुरावा करून निधी आणावा.- अभिजीत पाटील


Reactions

Post a Comment

0 Comments