राजमाता महिला पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठीचा आनंदोत्सव 2022 कार्यक्रम संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- राजमाता प्रतिष्ठान संचलित राजमाता महिला नागरी सह. पतसंस्था व धनगर समाज सेवा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदोत्सव 2022 याअंतर्गत महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे कार्यक्रम राबविण्यात आले होते. दि. 08 मार्च महिला दिनी व दि. 09 मार्च रोजी सदरचा कार्यक्रम शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन याठिकाणी पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मिनलताई साठे व राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या संस्थापिका तथा सांगोला नगरपरिषदेच्या मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने उपस्थित होत्या. यावेळी माढा नगराध्यक्षा सौ. मिनलताई साठे यांनी मनोगतामध्ये महिला दिनाबद्दलची माहिती व महत्व उपस्थित महिलांना पटवून सांगितले. तसेच माढा शहरामध्ये घरांच्या बाहेर ज्या पुरूषांच्या नावाची पाटी असते, त्याठिकाणी घरातील महिलांच्या नावाची पाटी लावण्याचा ठराव तेथील नगरपरिषदेमध्ये मंजूर करून त्याबाबतची अंमलबजावणी सुध्दा केली असल्याचे सांगितले. व सांगोला नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्षा यांनी सुध्दा सांगोला शहरातील घरांच्या बाहेर महिलांच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम हाती घ्यायला हवा, असे आवाहनही केले. तसेच सौ. राणीताई माने यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळामध्ये केलेल्या कार्याची स्तुतीसुध्दा मिनलताई साठे यांनी केली. सदरच्या कार्यक्रमाला महिलांनी दाखविलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी महिलांचेही कौतुक केले. तसेच सांगोला शहराच्या मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने त्यांच्या मनोगतामध्ये महिला दिनाचे महत्व पटवून उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याठिकाणी माजी उपनगराध्यक्षा सौ. स्वातीताई मगर, महिला सह. सुतगिरणीच्या संचालिका शुभांगी पाटील, धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मिनाक्षी येडगे, खांडेकर मॅडम यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. तसेच त्यांचे बक्षीस वितरणही करण्यात आले. यामध्ये वेशभूषा स्पर्धेसाठी 12 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांकाचे 5001 रू.चे बक्षीस मिनाक्षी बेंगलोरकर व संजना बेंगलोरकर, द्वितीय क्रमांकाचे 3001 रू.चे बक्षीस श्वेता घोंगडे व लक्ष्मी स्वाती, तृतीय क्रमांकाचे 2001 रू.चे बक्षीस दिपाली बसवदे व मनिषा जगताप, उत्तेजनार्थ 1001 रू.चे बक्षीस विनिता सूर्यवंशी व मनिषा सावंत, उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविल्याबद्दल 500 रू.चे बक्षीस कोमल शिंगाडे व ज्ञानेश्वरी शिंगाडे यांना देण्यात आले. वेशभूषा स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून शुभांगी पतंगे मॅडम व डॉ. मेघ्ना देवकते यांनी काम पाहिले. तसेच नृत्य स्पर्धेसाठी एकूण 7 ग्रुपने सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांकाचे 10001 रू.चे बक्षीस जय हो ग्रुप, द्वितीय क्रमांकाचे 7001 रू.चे बक्षीस स्टेप अप ग्रुप, तृतीय क्रमांकाचे 5001 रू.चे बक्षीस स्टार ग्रुप व उत्तेजनार्थ 3001 रू.चे बक्षीस माधुरी पवार ग्रुप यांना देण्यात आले. या नृत्य स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून शगुफ्ता तांबोळी (पंढरपूर) व मृणाला राऊत यांनी काम पाहिले. यानंतर पाक कला स्पर्धेसाठी एकूण 29 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांकाचे नेरलेप थ्री पीस सेट बक्षीस वैजयंता दौंडे, द्वितीय क्रमांकाचे नेरलेप कुकर बक्षीस स्वाती गुळमिरे, तृतीय क्रमांकाचे नेरलेप कढई बक्षीस अनिता शेटे व उत्तेजनार्थ चपाती डबा बक्षीस पुनम सावंत यांना देण्यात आले. या पाककला स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून पतंगे मॅडम व छाया यादव मॅडम यांनी काम पाहिले. त्याचबरोबर होममिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे 4999 रू.ची जिजामाता पैठणी बक्षीस चेतना सक्रे, द्वितीय क्रमांकाचे 2499 रू.ची सेमी सिल्वर पैठणी बक्षीस रेश्मा गावडे व तृतीय क्रमांकाचे 1999 रू.ची मोर सिल्वर पैठणी बक्षीस सोनाली उकिरडे यांना देण्यात आले. तसेच लकी ड्रॉ स्पर्धेसाठी स्वाती घोंगडे, ज्योती गडहिरे, प्रियांका दोडके, रंजना नलवडे व विमल जाधव यांना प्रत्येकी 4 थाळी जेवणाचा डबा बक्षीस म्हणून देण्यात आला. यावेळी सांगोल्यातील कोविड सेंटर याठिकाणी सेवा देणार्या खाजगी परिचारिका व माऊशी यांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक आदर्श माता यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या नगरपरिषदेच्या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये नगरपरिषदेमधील सौ. प्रतिभा कोरे व कल्पना गेजगे मॅडम यांनी व्यवस्थितरित्या सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्षा सौ. स्वातीताई मगर, राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या चेअरमन तथा मा. नगरसेविका सौ. अप्सराताई ठोकळे, माजी उपनगराध्यक्षा श्रीमती भामाबाई जाधव, मा. नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, सौ. विजयाताई बनसोडे, माजी नगरसेविका सौ. अनुराधा खडतरे, सौ. शुभांगी माने, माढा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. कल्पना जगदाळे, नगरसेविका गितांजली देशमुख, शारदा शेळके (माढा), राजमाता महिला पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन प्रियांका श्रीराम, संचालिका स्वप्नाली सादिगले, संचालिका राणी संजय माने, संचालिका कुशाला बिरूदेव माने, संचालिका नकुशा जानकर, संचालिका जानकी घाडगे, संचालिका सिंधुबाई भोकरे, संचालिका कविता वाघ, सेक्रेटरी मनिषा हुंडेकरी, पल्लवी कांबळे, सुधामती माळी, निलिमा बनसोडे यांच्यासह धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाक्षी येडगे, उपध्यक्षा दिपमाला सरगर, सचिव मिनाक्षी गडदे, खजिनदार कल्पना माने, शांता हाके, अर्चना लवटे, आशा सरगर मॅडम, अॅड. खांडेकर मॅडम, मासाळ मॅडम, रूपाली मदने यांच्यासह इतर महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व होममिनिस्टर स्पर्धेचे परिक्षक म्हणून अनुपमा गुळमिरे यांनी काम पाहिले. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती चोरमुले व अश्विनी पुजारी यांनी केले तर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या महिलांचे आभार शोभनतारा ठोंबरे व दिपमाला सरगर यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजमाता महिला पतसंस्थेचे संचालक मंडळ व धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments