Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त एकता महिला मंडळाच्यावतीने टेंभुर्णी ग्रामपंचायतमधील महिला कर्मचार्यांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त एकता महिला मंडळाच्यावतीने टेंभुर्णी ग्रामपंचायतमधील महिला कर्मचार्यांचा सन्मान 




टेंभुर्णी ,(कटूसत्य वृत्त):- जागतिक महिला दिनानिमित्त टेंभुर्णी येथील एकता महिला मंडळाच्यावतीने टेंभुर्णी ग्रामपंचायतमधील महिला कर्मचारी व महिला सफाई कामगारांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा संघटक तथा दहिवलीच्या सरपंच कौसर जहागीरदार यांच्या हस्ते तर अकोले खुर्द च्या सरपंच रूपाली नवले व महिला उद्योजिका स्वाती पाटील भीमानगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहोपयोगी वस्तू भेट देऊन सन्मानित करण्यात आले.प्रारंभी सरपंच कौसर जहागीरदार, रूपाली नवले, उद्योजिका स्वाती पाटील भीमानगरकर, एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा पाटील, उपाध्यक्षा छाया जाधव, अंजली अरगडे, उल्फत मुलाणी स्मिता पालांडे,हवाबी मुलाणी, स्त्री शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शीला पाटील, सचिव सविता जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना उद्योजिका स्वाती पाटील म्हणाल्या की,  महिलांनी विविध क्षेत्रात उतरून आपले कर्तृत्व दाखविले पाहीजे. प्रत्येक महिलांच्या अंगी कलागुण असतात त्यास वाव मिळाला पाहीजे. महिलांनी समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करून सक्षमपणे पुढे आले पाहीजे. एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा पाटील म्हणाल्या की, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पहिल्या स्त्री शिक्षिका  सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला पंतप्रधान कै. इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला यांचा आदर्श महिलांनी डोळ्यासमोर ठेवला पाहीजे. स्त्री पुरूष समान असून प्रत्येक क्षेत्रात महिला उत्कृष्ट कार्य करीत आहेत. कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन दिले पाहीजे. कुटुंबातील निर्णय तिच्यावर न लादता निर्णय प्रक्रियेत तिला सामावून घेतले पाहीजे. स्त्री सन्मानाची सुरूवात आपल्या घरापासून करायला हवी तरच भारत सुरक्षित, सक्षम होईल यावेळी दहीवलीच्या सरपंच कौसर जहागीरदार व अकोलेखुर्द च्या सरपंच रूपाली नवले यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांमध्ये संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. प्रा. सत्वशिला ढवळे (प्रथम)व सोनल नलवडे (व्दितीय) क्रमांक पटकावून बक्षीस मिळविले.  या कार्यक्रमास वैशाली शिंदे, रेणूका भणगे, राणी अटकळे, मनिषा भोसले, जयश्री ताबे, सत्वशिला ढवळे, रेखा पाटील, अभिता खटके, सोनल नलवडे, भाग्यश्री पाटील, संगिता चव्हाण, स्वाती राऊत, पुष्पा ताबे, शैलजा पाटील,बेबी अटकले, कोमल निंबाळकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली अरगडे यांनी केले तर आभार हवाबी मुलाणी यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments