नांदेडमधील दिव्यांगांना तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली ?
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधव हक्कासाठी पडत झडत तहसिलदार,व गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन देऊन मुदतीत उतर देण्याची विनंती केली तरी दिव्यांगाच्या निवेदनाला दाखवली केराची टोपली ? चंपतराव डाकोरे पाटिल यांचा सवाल
नांदेड (कटूसत्य वृत्त):- दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व मा तहसिलदार व गटविकास अधिकारी साहेब यांना ता अध्यक्ष शिष्टमंडळाने दोन्ही अधिकारी यांना निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दिव्यांग बांधव पडत जडत आपल्या हक्काच्या मांगन्या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातील प्रश्नाचे लेखी ऊतर ९ मार्च २२ पर्यंत न मिळाल्यास दि १३ मार्च २२ पासुन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरने व अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा ईशारा देऊन सुध्दा दिव्यांगाना न्याय तर मिळतच नाही साधे ऊतर सुध्दा देण्यासाठी वेळ मिळत नसेल तर दिव्यांग हक्क २०१६ कायद्याप्रमाणे व दप्तर दिंरगाई कायदा फक्त कागदोपञीच आहे काय असा सवाल दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केला.
तसेच दिव्यांग कक्ष अधिकारी जि प नांदेड यांना भेटून निवेदन देऊन चर्चा करून नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी संबधित अधिकारी यांना आपल्या मार्फत निवेदन देऊन दिव्यांग बांधवांचे दि १३ मार्च २२ चे धरने व अनेक प्रकारचे आंदोलन संबधित अधिकारी यांना वेळ मिळावा म्हणून आठ दिवसांनी पुढे ढकलण्यात आले व पुढील आंदोलन कोणतेही पुर्व सुचना न देता आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात दिव्यांगाच्या जिवितास धोका झाल्यास शासन प्रशासन जबाबदार राहिल याची गंभीर दखल शासन प्रशासन यांनी घ्यावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर जी अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांनी दिले.
0 Comments