सोनार समाज महिला तेजस्विनी चा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री विश्वब्राम्हण समाज कालिका सेवा मंडळ , श्री कालिका नागरी सहकारी पत संस्था , श्री कालिका प्रतिष्ठान आणि सोनार समाज संघटना , सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर सोनार समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिला तेजस्विनी चा पुरस्कार वितरण सोहोळा दिनांक 13 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 4 :00 वाजता ,"श्री कालिका देवी मंदिर ," शुक्रवार पेठ सोलापूर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला .पुरस्काराचे स्वरूप श्री कालिका देवीचे फोटो , प्रमाणपत्र , पर्स ,बुके असे होते .
" या आहेत पुरस्काराचे मानकरी " गायत्री सुशीलकुमार वेदपाठक,प्रतिभा मोहनराव धोत्रिकर .
शैलजा पोतदार, सुनंदा गजानन सोनार पंडीत, शशिकला दे . येरनालकर पंडीत, शशिकला भा. वेदपाठक, मृणालिनी सं .मैंदर्गिकर, रुपाली र .दीक्षित, पल्लवी अ . महामुनी, मीरा जि .महामुनी, अन्नपूर्णा दे . धर्माधिकारी, शैला ना . धाराशिवकर, सुनंदा म . पोतदार, संध्या सं .कलमणकर, साधना स . वेदपाठक, अंजली दि . कुरुलकर,स्मिता म . पोतदार, प्रिया अ . धर्माधिकारी,शिल्पा ज . तुळजापूरकर, छाया किशोरकुमार पंडीत, प्रतिभा ना . महामुनी,शैलजा ना .कुरुलकर, रेखाताई जोशी, मीना शा .शिदवाड कर, स्वाती अ . दीक्षित, अनुप्रिया कै . अवसेकर, शुभांगी हे .महामुनी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा . अंबिका पोतदार या तर प्रमुख अतिथी म्हणून विजया मं द्रूपकर,चित्रा पोतदार , शिला क्षिरसागर , प्रा अस्मिता पोतदार आणि सुनीता क्षिरसागर या होत्या. मृणालिनी मैं दर्गिकर , पल्लवी महामुनी, प्रतिभा धोत्रिकर यांनी मनोगत व्यक्त केले . प्रा.अमर दीक्षित यांनी महिला दिन साजरा का केला जातो याबाबत माहिती दिली . प्रा.अंबिका पोतदार यांनी महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि घ्यावंयाची काळजी यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. उमेश कुरुलकर यांनी प्रास्ताविक केले. सचिन क्षिरसागर यांनी आभार मानले. प्रिया धर्माधिकारी यांनी सूत्रसंचलन केले.
सध्या देश आझादीका अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याचाच भाग म्हणून सोनार समाजातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदरणीय वसंतराव पोतदार यांचा उमेश कुरुलकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
कार्यक्रमाच्या यशस्वी पणे पार पाडण्यासाठी चारही संस्थेचे उमेश कुरुलकर , मोहन मंद्रूपकर , संतोषसेठ कलमणकर , संजय मैंदर्गिकर , वसंत पोतदार ,गुरुदत्त वेदपाठक आदी पदाधिकारी , तसेच लक्ष्मीकांत जिंदम, अनिता सारंगमठ ,राजश्री टाक, राकेश हिरेमठ, नरोडे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment