सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी वीस कोटी रुपये मंजूर : १४ गावांमध्ये आनंदाचे वातावरण :दादासाहेब लवटे
सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला तालुक्यात कोणत्याही पाणी योजनेमध्ये समाविष्ट नसणारी इटकी,खवासपूर,लोटेवाडी जुनी-नवी,अजनाळे, कटफळ, लक्ष्मीनगर, यलमर मंगेवाड, चिक-महूद खालील जाधववाडी तळेवाडी, व वाकी खालील नरळेवाडी, सोनलवाडी ,बागलवाडी ही गावे होती परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदारकी मिळाल्यानंतर सन १९९८ साली मंजूर झालेली व २००५ साली बंद पडलेली २२ गावची सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा चालू केली व त्या चौदा गावचा सर्वे करण्याची अडीच कोटी रुपयांची निविदा काढून एक जुलै २०२१ रोजी लोटेवाडी गावामध्ये श्रीफळ फोडून ड्रोन सर्वेक्षणाची सुरुवात केली. उद्घाटन करते वेळी हजारो लोकांच्या साक्षीने आमदार शहाजीबापू पाटील यांनी शब्द दिला होता की लवकरच निधी मिळवून योजना सुरू करू केवळ आठच महिन्यात ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करून जलसंपदा मंत्रालयाकडे अहवाल सादर करून काल झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थ संकल्पातून 20 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातून सुमारे दोन टीएमसी पाणी सांगोला तालुक्याला मिळणार आहे .कधीही कल्पना केली नव्हती ती योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असताना बळीराजा प्रचंड सुखावला आहे, या योजनेमुळे १४गावातील ५२ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गावागावांमध्ये शेतकरी कष्टकरी व कामगारांमध्ये आता पाणी मिळणार पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, ही चर्चा जोरात वाढत आहे.
0 Comments