Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीस फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या टीमने केले जेरबंद

 लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीस फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या टीमने केले जेरबंद

सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील कडलास या गावातील एका कुटुंबास लग्नाचे आमिष दाखवून पैसे व सोने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या वतीने अवघ्या काही तासातच करण्यात आला. सदर टोळीतील आरोपीला ताब्यात घेऊन रोख 80 हजार रुपये व दोन तोळे सोने ऐवज हस्तगत करण्यात आले त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या पोलिसांच्या कार्यतत्परते प्रति सन्मान म्हणुन फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या टीमचा मानाचा फेटा व पुष्पगुच्छ  देऊन सन्मान करण्यात आला.

घटनेची हकीकत अशी आहे की सांगोला येथील कडलास गावातील जाधव कुटुंबबियांची सोलापुरातील संतोष पवार नावाच्या व्यक्तीने आमची मुलगी आहे लग्नासाठी सोयरीक जमवा, आमचा संसार पुरामध्ये वाहून गेल्यामुळे आमच्याकडे कोणतीच कागदपत्र नाहीत व आमचे कोणी पाहुणे नाहीत असे सांगून आम्ही गरीब आहोत आम्हाला लग्नासाठी दीड लाख रुपये द्या अशी मागणी केली असता जाधव कुटुंबीयांनी त्यांना 80 हजार रुपये रोख दिले. मुलगी बघायला आल्यावर  गडबडीत साखरपुडा सुद्धा उरकून घेतला तसेच दिनांक 16 मार्च 2022 ला लग्न करण्याचे ठरले होते त्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी वधु मुलीला घेण्यासाठी वराच्या आजोबांना सोलापूरला येण्याचे कळवले, तसेच येताना मुलीचे सोने सुद्धा घेऊन या असे सांगितले असता दोन तोळे सोने घेऊन स्टैंड वर या तिथून मुलीला घेऊन आपण गावाकडे जाऊ असे आरोपी संतोष पवार याने सांगितले, वराचे आजोबा - मनोहर जाधव एसटी स्टँडवर आले असता आरोपी संतोष पवार (गवंडी) याने त्यांना गाडीवर हिराचंद नेमचंद वाचनालय जवळ घेऊन आले, आरोपी सोबत दोन महिला होता त्या महिला म्हणाल्या आम्ही मुलीला बांगड्या घेण्यासाठी नवी पेठ कडे आलो आहोत ते सोने दाखवा आम्ही आमची अपंग (नातलग) तिला दाखवून येतो असे म्हणून सोने घेऊन त्या पसार झाल्या काही वेळाने आरोपी संतोष पवार याने पण मी लगेच जाऊन येतो म्हणून तिथून तो पसार झाला चार वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली, त्यानंतर आरोपीकडून कसलाही संपर्क झाला नाही त्यामुळे वराच्या आजोबांनी आपल्या गावाकडे फोन करून आपल्या मुलाला-सुनेला व नातवाला बोलून घेतले, वर-पक्षास आपली फसवणूक झाल्याची कल्पना येताच त्यांनी त्यांच्या ओळखीचे संभाजी ब्रिगेडचे (सांगोला) तालुका अध्यक्ष प्रदीप मिसाळ यांना ही गोष्ट कानावर घातली त्यांनी लगेच सोलापूर येथील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांना संबंधित घटना सांगून त्या जाधव कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली असता तात्काळ संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष गजानंद शिंदे, संघटक मल्लू भंडारे यांनी संबंधित कुटुंबाची सोलापूर भेट घेऊन त्या आरोपीविरूद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद देण्यास सांगितले, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला त्यांनी तात्काळ त्या आरोपीचा मोबाईल ट्रॅक् करायला सांगितला आणि तशा सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या असता संबंधित आरोपीचा मोबाईल लोकेशन जुळे सोलापुरातील कल्याण नगर येथे दाखवत होता त्यामुळे पोलिसांनी त्या लोकेशन ट्रॅक करून आरोपीला पकडले तेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्नही केला असता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने दोन तोळे सोने व काही रोख रक्कम पोलिसांकडे जमा केली आरोपीवर 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काही तासातच या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील साहेब, अमोल खरटमल, सचिन कुलकर्णी, दिपक डोके, लक्ष्मण पवार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष शाम भैय्या कदम यांच्या हस्ते शाल-फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला...यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम,अरविंद शेळके, महेश भंडारे, गजानन शिंदे, सिताराम बाबर, नाग पवार, सुलेमान पिरजादे बसवराज आळंगे ईत्यादी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

1 Comments

  1. Sports Betting - Mapyro
    Bet the moneyline worrione from 1:25 PM to 11:00 herzamanindir PM. See more. MapYO Sportsbook features goyangfc live 출장샵 odds, live aprcasino streaming, and detailed information.

    ReplyDelete