राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर येथे आगमन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 4, 2022

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर येथे आगमन

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर येथे आगमन


 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सकाळी  10 वाजता हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम आदि उपस्थित होते.प्रारंभी सोलापूर महापालिकेच्या प्रथम नागरिक महापौर यन्नम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी  शंभरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages