अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे भरण्याच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 17, 2022

अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे भरण्याच्या सूचना

 अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे भरण्याच्या सूचना



आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली होती मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचेकडे मागणी   

अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ७८ पदे रिक्त आहेत. ती तत्काळ भरण्याच्या सूचना महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिल्या. यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी अॅड. ठाकूर यांना निवेदन दिले होते. माळशिरस पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात माळशिरस व अकलूज असे दोन प्रकल्प कार्यरत आहेत. या दोन्ही प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांची ७८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोषण आहार ,बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची जनजागृति व इतर यासारख्या आवश्यक सेवांवर तसेच अंगणवाड्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात मान्यता द्यावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात तातडीने कारवाई व्हावी अशा लेखी सूचना अॅड यशोमती ठाकूर यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांना दिल्या आहेत. माळशिरस तालुक्यात माळशिरस व अकलूज प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविकांची ४१०, मिनी अंगणवाडी सेविकांची १६७ आणी मदतनिसांची ४१० पदे मंजूर आहेत .त्यापैकी अंगणवाडी सेविकांची २४ मिनी सेविकांचे१ ,मदतनिसांची ५३ असे मिळून एकूण ७८ पदे रिक्त आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यासदर्भात पाठपुरावा केल्याने ही रिक्त पदे लवकर भरण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages