Ads

Ads Area

वचनरक्षक कक्कय्या पुस्तकाचे मंगळवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कक्केरीत प्रकाशन

वचनरक्षक कक्कय्या पुस्तकाचे मंगळवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कक्केरीत प्रकाशन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बाराव्या शतकातील ज्येष्ठ वचनकार आणि महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखालील कल्याणक्रांतीनंतर वचन रक्षणासाठी बलिदान देणारे शरण डोहर कक्कय्या यांचे जीवनचरीत्र असलेल्या ‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि.1 मार्च 22 रोजी कक्कय्यांचे समाधीस्थळ कक्केरी येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ हे श्रेष्ठशरण डोहर कक्कय्यांच्या चरित्राची सर्वंकष मांडणी करणारे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. कक्कय्यांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन घेण्यात आलेल्या समकालीन संदर्भातील नोंदी या पुस्तकाचे बलस्थान आहे. त्यासाठी लेखक आणि प्रकाशकांनी दोन हजारहून अधिक कि.मी. प्रवास केला आहे. महाशिवरात्री रोजी कक्केरी येथे शरणश्रेष्ठ कक्कय्या यांची मोठी जत्रा असते. या पार्श्वभूमिवर कक्केरी येथे सोलापूरच्या सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने होणार्‍या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास विलक्षण महत्व आहे.
मंगळवार दि. 1 मार्च 22 रोजी सकाळी 10 वाजता शिंदे दांपत्याच्या हस्ते आणि श्रीगुरुदेव आश्रमच्या परमपूज्य गुरूमाता नंदाताई यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा होत आहे. आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. ‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ या पुस्तकाचे सोलापूरच्या चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे या दोघा लेखकांनी संयुक्तपणे केले असून सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रगती प्रकाशनने ते प्रकाशित केेले आहे. या कार्यक्रमास शरण साहित्याच्या अभ्यासकांनी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे आणि प्रगती प्रकाशनचे दत्ता थोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close