माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रयत्नाने
जिल्हा दुध संघावर सत्ताधाऱ्यांचे पुन्हा वर्चस्व
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे यांच्या सुनबाई वैशाली साठे पराभूत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात यंदा दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली जितेंद्र साठे या विरोधात दूध संघ बचावचा उमेदवार असल्याने हे निवडणूक प्रतिष्ठेची झाली. यापूर्वी 17 संचालक पैकी ओबीसी मधून काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी माघार घेतल्याने दीपक माळी हे बिनविरोध झाले.उर्वरित सोहळा जागेसाठी निवडणूक लागली त्यासाठी 31 उमेदवार रिंगणात होते शनिवार 26 फेब्रुवारी रोजी बाळे परिसरातील चंडक प्रशालेमध्ये मतदान झाले. सकाळी आठ ते पाच दरम्यान 316 मतदारांपैकी चुरशीने 313 मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. आपल्या सून उमेदवार असल्याने काका साठे हे दिवसभर मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. दरम्यान पराभवाची चाहूल लागताच काका साठे हे मतदान केंद्र सोडून निघून गेले, सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने एकहाती सत्ता प्रस्थापित केली.
दूध संघ बचाव कृती समितीचा सुपडा साफ झाला, काका साठे यांच्या सुनबाई वैशाली साठे यांच्या विजयाची आशा होती मात्र त्यांनाही पराभव पत्करावा लागला.
■ दूध संघ बचाव सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
अनिल अवताडे 90
सुवर्णा इंगळे 88
कांचन घाडगे 84
भाऊसाहेब धावणे 88
पार्वतीबाई पाटील 79
संजय पोद्दार 81
सुनीता शिंदे 84
■ शेतकरी विकास पॅनल सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
बबनराव आवताडे 189
मनोज गरड 189
अलका चौगुले 202
बाळासाहेब माळी 227
राजेंद्र मोरे 218
संभाजी मोरे 214
विजय येलपले 211
मारुती लवटे 226
औदुंबर वाडदेकर 218
रणजितसिंह शिंदे 207
वैशाली शेंबडे 199
योगेश सोपल 201
■महिला प्रतिनिधी दूध संघ बचाव उमेदवार
संगीता लोंढे 67
वैशाली साठे 144
■शेतकरी विकास पॅनलचे महिला उमेदवार
निर्मला काकडे 160
छाया ढेकणे 206
■ भटक्या विमुक्त जाती उमेदवार
राजेंद्रसिंह पाटील 235
रमजान नदाफ 74
■अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी उमेदवार मंगल केंगार(दूध संघ बचाव) 80
जयंत साळे(शेतकरी विकास) 228
0 Comments