Ads

Ads Area

अवैध ताडी विक्रीप्रकरणी पहिल्यांदाच ऐम.पी.डी.ए. एक वर्षासाठी कारागृहात रवानगी

अवैध ताडी विक्रीप्रकरणी पहिल्यांदाच ऐम.पी.डी.ए.(M.P.D.A.); एक वर्षासाठी कारागृहात रवानगी

पुणे (कटूसत्य वृत्त):- अवैध ताडी विक्रीप्रकरणी एका गुन्हेगाराला एम.पी.डी.ए.{'M.P.D.A.)' अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी औरंगाबादच्या कारागृहात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवैध ताडी विक्रीच्या गुन्ह्यातील ही पहिलीच 'एम.पी.डी.ए.' कारवाई असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. 
अनिल व्यंकटेश भंडारी (वय २५, रा. गिरिराज चौक, पाषाण) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अवैध ताडी विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पोलिस आयुक्तालयाकडे 'एम.पी.डी.ए.' अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 'एम.पी.डी.ए.'अंतर्गत कारवाईचे आदेश जारी केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'डी' विभागाचे निरीक्षक संजय डेरे, दुय्यम निरीक्षक गणेश केंद्रे, जवान सागर ध्रुवे आदींनी ही कारवाई केली. अवैध ताडी आणि दारू विक्रीप्रकरणी 'एम.पी.डी.ए.(M.P.D.A.)' कारवाईबाबत पुणे पोलिस आयुक्तालयाकडे चार प्रस्ताव, पिंपरी पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयास प्रत्येकी एक असे एकूण सहा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, 
असे अधीक्षक झगडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close