Ads

Ads Area

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीचा आज विस्तार

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीचा आज विस्तार


नवीन गावप्रमुख गणप्रमुख व गट प्रमुखांच्या होणार नियुक्त्या


सांगोला (कटूसत्य वृत्त):- महिलांच्या सामाजिक किंवा राजकीय प्रश्नावर नेहमीच आग्रही भूमिका घेऊन महिलांच्या न्याय हक्कासाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सांगोला तालुका कार्यकारिणीचा आज शनिवार दि 5 फेब्रुवारी रोजी स ११. वा. सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथून विस्तार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे यांनी दिली. या कार्यक्रमास मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याच्या उपाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सुप्रिया गुंड पाटील, तसेच जिल्ह्याच्या निरीक्षक दिपाली पांढरे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार तसेच महिलांना समानतेची वागणूक व राजकारणात समान संधी देणाऱ्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचा व महिला विषयक धोरणांचा प्रसार गावोगावी खेडोपाडी करण्यासाठी सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात गावप्रमुख, प्रत्येक पंचायत समिती गणासाठी गण प्रमुख व जिल्हा परिषद गटासाठी गटप्रमुख आदी पदांवर महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमास सांगोला शहर तसेच ग्रामीण भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या व महिला मतदार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे यांनी केले.



 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close