सांगोला - उपसभापतींच्या गावातील प्रकार -"आधी पाईप लाईन मग टेंडर"

महिला सरपंचास डावलून ग्रामसेवकच बनले गावचे कारभारी
सांगोला (कटूसत्य वृत्त):- आधी पाईप लाईन मग टेंडर प्रसिद्ध करून ग्रामपंचायतीची रक्कम हडप करण्यासाठी आसुलेला ग्रामसेवक ओबीसी महिला सरपंचास डावलून स्वतःच गांवचे कारभारी बनत असल्याचा प्रकार मांजरी ता सांगोला येथे घडला आहे.विद्यमान उपसभापती नारायण जगताप यांच्या गावातच हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य मात्र हवालदिल झाले आहेत. याबाबतीत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .मांजरी ग्रामपंचायतीने गावठाण, गांव वाड्या वस्तीवर पाईप लाईन करणे साठी 15 व्या वित्त आयोगातून 9 लाख15 हजार नऊशे अठ्ठयाऐशी रुपयाचे ई निविदा (टेंडर) दिनांक 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या होत्या.निविदा भरण्याचा दिनांक 19 जानेवारी 2022 पर्यत असतानाच गावच्या ग्रामसेवकाने टेंडर मुदत संपण्या अगोदरच काम पूर्ण करून मी किती कामसू आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.मांजरी गावचे ग्रामसेवक कालीदास खताळ यांना स्वतःलाच काम करायचे होते, तर त्यांनी ई निविदा प्रसिध्द केल्याच कशासाठी? असा प्रश्न जनतेतून चर्चिला जात आहे. गेली 30 वर्षे गाव पाण्यासाठी संघर्ष करीत असून या कालावधी मध्ये या गावाला अनेक पुरुष सरपंच होऊन गेले,परंतु एकदाही सरपंचास गांवचा पाण्याचा प्रश्र मिटविण्याचा ध्यानी मनी आलेले नाही.महिला सरपंचानीच गावचा पाण्याचा प्रश्र कायमचा मिटविण्याचा विषय घेताच श्रेय वादामुळेच गावच्या करभाऱ्याने ओबीसी महिला सरपंचास डावलून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी टेंडर मुदत संपण्या अगोदरच काम पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , गटविकास अधिकारी आनंद लोकरे ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता सुरशे कमळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सामाजीक कार्यकर्त्याने तक्रार केलेली असुन या गावच्या कारभाऱ्याने केलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी,अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
0 Comments