Hot Posts

6/recent/ticker-posts

जुगाड गाडी ते चार चाकी वाहन दत्ताचा अखेर दत्ता शेठ झाला

 जुगाड गाडी ते चार चाकी वाहन दत्ताचा अखेर दत्ता शेठ झाला


नाझरे (कटूसत्य वृत्त):-मी स्वतः बनवलेली चार चाकी जुगाड गाडी नाझरे ता सांगोला येथे घेऊन आलो ते वेळी पत्रकार रविराज शेटे यांनी स्वतः गाडीत बसून गाडीची पाहणी केली व अवघ्या 50 हजारात तयार केलेल्या गाडी ची बातमी सातासमुद्रापलिकडे गेली त्यामुळे माझी जुगाड महिंद्रा कंपनीने विमानाने चेन्नईला नेली व मला नवीन बोलेरो गाडी दिली व माझ्यासारख्या गरीब लोहारा ला न्याय मिळवून दिला व याचे सर्व श्रेय पत्रकार शेटे सरांचे आहे असे मत दत्ता लोहार कडेगाव जि सांगली यांनी व्यक्त केले. आज मी स्वतः सरांच्या घरी गाडी घेऊन आलो व सरांनी माझा सत्कार केला व यापूर्वी त्यांनी ओ दत्ता शेठ तुम्ही नादच केला थेट अशी बातमी देऊन खरोखरच आमचा नाद पूर्ण केला व बातमीत किती ताकद आहे आत्ता समजले कारण दत्ताचा दत्ता शेठ असे सर्वजण म्हणु लागले परंतु आम्ही तर म्हणतोय की शेटे सर तुमचा नाद थेट - दत्ता लोहार (कडेगाव)    ग्रामीण भागातील व गरीब लोहार कुटुंबात दत्ता कडेगाव जि सांगली खर्‍या अर्थाने ग्रामीण शास्त्रज्ञच आहे व तो जुगाड गाडी घेऊन नाझरे येथे आला व आपण केवळ त्याची प्रसिद्धी केली की दत्ता शेठ तुमचा नादच थेट म्हणून परंतु त्याच्या संधीचे सोने झाले व हे वृत्त सर्व पेपर यूट्यूब टीव्ही माध्यम सर्वत्र पोहोचले व दत्तास महिंद्रा कंपनीने बोलेरो दिली त्यामुळे कंपनीचे ही सर्वत्र कौतुक होत आहे व सामान्य माणसाच्या कलेची जाण त्यांनी ठेवून नवीन गाडी दिली परंतु आज सर्वसामान्य लोहार कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मनस्वी आनंद आपणास झाला व आपण केलेली पत्रकारीताही सर्वसामान्यांसाठी उपयोगी पडली व महिंद्रा कंपनीचे ही आभार मानावे लागेल परंतु श्री दत्तगुरु श्रीधर स्वामी व संजीवा स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने मुळे अखेर दत्ता शेठ झाला आपण नाममात्रच आहोत व दत्ता लोहार खऱ्या अर्थाने ग्रामीण शास्त्रज्ञच आहे हे सिद्ध झाल.
Reactions

Post a Comment

0 Comments