Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रिडा संकुलन नगरपरिषद हद्दीतील गट नं ४१९ या जागेमध्ये होणार- आ. यशवंत माने

 क्रिडा संकुलन नगरपरिषद हद्दीतील गट नं ४१९ या जागेमध्ये होणार- आ. यशवंत माने 

 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यासाठी होणारे गेल्या अनेक वर्षापासुन  प्रलंबित असणाऱ्या क्रिडासंकुल वारणी बाबत तालुका क्रीडा अधिकारी सत्यम देशमुख क्रीडा क्रीडा संकुल समिती अध्यक्ष आमदार यशवंत तात्या माने यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तहसील कार्यालय येथे

 शुक्रवार दि ४ फेब्रुवारी २०२२ रोजी मोहोळ क्रिडा समीतीची बैठक पार पडली. 


या बैठकी दरम्यान झालेल्या सकारात्मक  चर्चेनंतर सुचवलेल्या काही जागांपैकी मोहोळ नगरपरिषद हद्दीतील घाटणे रोडवरील कचरा डम्पिंग ग्राउंड शेजारच्या गट नंबर ४१९ मधील ३ हेक्टर क्षेत्र या संकुलासाठी निश्चित करण्यात आले आहे. येथे सर्व सोयी सुविधायुक्त क्रिडा संकुलाची  उभारणी करण्यात येईल अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली. 


मोहोळ पोलीस स्टेशनची मंजूर झालेली नवी इमारत आणि पोलीस कॉलनीचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. या पुढील काळात आपल्या मोहोळचे बसस्थानक त्याचबरोबर मोहोळच्या सर्व प्रशासकीय विभागाची मध्यवर्ती इमारत आणि इतर महत्त्वाचे प्रमुख प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी वचनबद्ध आहे. माध्यमांशी बोलताना आमदार माने म्हणाले. 


  या बैठकीसाठीराष्ट्रवादीचे युवा नेते तथा पं.स. सदस्य अजिंक्यराणा पाटील,तहसीलदार प्रशांत बेडसे, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर,गटविकास अधिकारी गणेश मोरे,सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता गणेश क्षीरसागर,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ योगेश डोके,तालुका क्रिडा अधिकारी सत्येन जाधव, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांच्यासह अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

   या झालेल्या बैठकीत क्रिडा संकुलाचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आमदार यशवंत माने यांनी मार्गी लावल्याबद्दल तालुकावासियांतुन क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केले जात आहे. 


या बैठकीनंतर उपस्थित अधिकारी आणि आमदार माने यांना भेटून जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे सर,भाजपचे सतीश काळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजयकाका देशमुख, नागेश वनकळसे सर यांनी आमदार माने यांनी केलेल्या अविरत पाठपुराव्याबद्दल आमदार माने यांचे आभार मानले.


क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न आता मार्गी लागला असून मार्च अखेरीस हे काम सुरू होईल. आजवरच्या कालावधीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भावनेने सहकार्य केले आहे. या पुढेही सर्वांनी असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मोहोळचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने त्या समस्या प्राधान्याने आणि अधिक गतिमान निर्णयप्रक्रियेने सोडवण्याचा माझा निश्‍चितपणे प्रयत्न राहणार आहे.

आमदार यशवंत माने 

मोहोळ विधानसभा

Reactions

Post a Comment

0 Comments