जयहिंद विद्यालयात समाज दिन साजरा
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची ११९ वी जयंती विद्यालयात समाज दिन म्हणून साजरी करण्यात आला.
यावेळी एस.पी.शुगरचे चेअरमन सुरेश पाटील साहेब, जि.प.सदस्य नानासाहेब वाघ, सरपंच मन्मथ आवटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोंडप्पा कोरे, उदय राजेनिंबाळकर, शा.व्य.समितीचे उपाध्यक्ष सुनिल वळेकर आणि विद्यालयाचे प्राचार्य गवळी एस.के. यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे संस्थापक, संवर्धक कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानिमित्ताने विद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त घेण्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, कथाकथन, कर्मवीर टॅलेंट सर्च परीक्षा या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी व शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गणित विभागामार्फत सुवर्ण, सिल्वर, ब्रांझ मेडल व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
यानंतर विद्यालयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक ८ विद्यार्थ्यांचा विद्यालयातील सहशिक्षक पालके एस टी. यांच्या कडून प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रत्येकी ५१ रुपये देऊन गौरविण्यात आले.
यानंतर उच्च माध्यमिक विद्यालयातील संस्थेअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गांधी विचार संस्कार परीक्षेतील ३८ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य गवळी एस.के.यांनी विद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुरेश पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे विचारधन सांगून आपण समाजामध्ये कसे वागले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी एस.पी.शुगरचे चेअरमन.सुरेश पाटील साहेब, जि.प.सदस्य नानासाहेब वाघ, सरपंच श्री. मन्मथ आवटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. कोंडप्पा कोरे, .उदय राजेनिंबाळकर,.लक्ष्मण पाटील, डॉ.मधूकांत पाटील, शा.व्य.समितीचे उपाध्यक्ष सुनिल वळेकर, पोपट जमाले,नाना पवार, .तेजस भालेराव, अमर शेख,विकास उबाळे,सुहास सावंत,किशोर कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .ठाकरे पी.के. आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक जगदाळे के.ए. यांनी केले.
0 Comments