Hot Posts

6/recent/ticker-posts

सोनी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनी मध्ये निवड

 सोनी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनी मध्ये निवड


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ०४-०२-२०२२ - देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयातील बी.सी.ए. भाग-3 व बी.एस्सी.(ईसीएस) भाग-3 मधील ५विद्यार्थ्यांची टीसीएस (TCS) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे.

यामध्ये बी.सी.ए. भाग-3 मधून  वैष्णवी दायमा, संतोष सुतार, दाऊद बडेखा, अभिषेक स्वामी व बी.एस्सी.(ईसीएस) भाग-3 मधून सुष्मिता ठाकूर त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  लक्ष्मीकांतजी सोमाणी, सचिव आनंदजी भंडारी, सहसचिव मधुसुदनजी करवा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर व उपप्राचार्या प्रा. हरदीप बोमरा, कॉम्पुटर विभागाचे विभागप्रमुख नवनाथ भंडारे, सर्व शिक्षकवृंद  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments