सोनी महाविद्यालयातील शिक्षकाचे सेट परीक्षेत यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ०४-०२-२०२२ - देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयातील ज्युनिअर विभागातील प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले अनिरुद्ध सतीश ठाकूर हे सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जैवरसायनशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झाले. यासाठी त्यांना डॉ. अकल्पिता अरविंदेकर, डॉ. वैशाली गरगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी सोमाणी, सचिव आनंदजी भंडारी, सह-सचिव मधुसुदनजी करवा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर व उपप्राचार्या प्रा. हरदीप बोमरा व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
0 Comments