कुरुल टाकळी मार्गे पंढरपूर या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करा अन्यथा खासदार आमदारांच्या गाडी पुढे हालगी लावून त्यांची मिरवणूक काढणार- प्रभाकर देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 23, 2022

कुरुल टाकळी मार्गे पंढरपूर या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करा अन्यथा खासदार आमदारांच्या गाडी पुढे हालगी लावून त्यांची मिरवणूक काढणार- प्रभाकर देशमुख

 कुरुल टाकळी मार्गे पंढरपूर या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करा अन्यथा खासदार आमदारांच्या गाडी पुढे हालगी लावून त्यांची मिरवणूक काढणार- प्रभाकर देशमुख

                                   

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या वीस वर्षापासून कुरुल ते टाकळी मार्ग सुस्तेा मार्गे पंढरपूर या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे गुडघ्या इतके खड्डे पडल्यामुळे जनतेला अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते त्यामुळे त्वरित या रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागण्यांचे निवेदन जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांचे नेतृत्वाखाली मोहोळ चे आमदार यशवंत माने व खासदार सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना देण्यात आले  गेल्या वीस वर्षापासून दुचाकी व चारचाकीने जनतेला प्रवास करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्वरित खासदार आमदारांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाचया कामाला त्वरित सुरुवात करावी अन्यथा यांच्या गाड्या अडवून हलगी वाजवुन त्यांची मिरवणुक काढून त्यांना जाब विचारणार असल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले काही लोकांचे अपघाताने जीव गेले पाय मोडले हात मोडले त्यामुळे त्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत त्यांची आमदार-खासदारांनी व अधिकाऱ्यांनी कधी विचारपूस केली का विशेषता शेतकऱ्यांचा या रोड वरून सात ते आठ कारखान्याला ट्रॅक्टर मधून ऊस जातो अशा परिस्थितीत ट्रॅक्टर पलटी झाला तर उसाच्या मोळ्या पडलेल्या परत ऊस भरायला टोळीवालयांना तीन ते चार हजार रुपये  द्यावे लागतात अश्या अनेक संकटांना जनता शेतकरी गेल्या वीस वर्षापासून सामोरे जात आहे आणि एकीकडे विधानसभेला व लोकसभेला विविध पक्षाचे उमेदवार मानतात मला मतदान करून आमदार करा खासदार करा मी रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणून शंभर टक्के टॉप टेन चे रस्ते  करून दाखवतो आणि मतदार संघाचा विकास करतो अशी बोगस आश्‍वासने लोकप्रतिनिधीने देऊन जनतेचा विश्वासघात केला असल्याचे पत्रकारांशी बोलताना प्रभाकर देशमुख यांनी सांगितले त्यामुळे खासदार आमदारांनी त्वरित डांबरीकरणाचे रस्त्याच्या  कामाला सुरुवात करावी अन्यथा खासदार आमदारांच्या गाड्या पुढे हलगी वाजवून त्यांची मिरवणूक काढून जनहित शेतकरी संघटना जनतेला बरोबर घेऊन जाब विचारणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी जनहित युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे महेश बिस्किटे विकास जाधव चंद्रकांत निकम पाटकुल चे उपसरपंच गणेश नामदे बंडू राजे भोसले बंडू नामदे शिवाजी वसेकर सुभाष शेंडगे बाळासाहेब सपाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages