लेकीच्या वाढदिवसानिमित्त पित्याचा स्तुत्य उपक्रम, लावून देणार दोन विवाह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

लेकीच्या वाढदिवसानिमित्त पित्याचा स्तुत्य उपक्रम, लावून देणार दोन विवाह

लेकीच्या वाढदिवसानिमित्त पित्याचा स्तुत्य उपक्रम, लावून देणार दोन विवाह





शिरभावी येथील जगदाळे परिवाराचा आगळा वेगळा संकल्प

सांगोला (जगन्नाथ साठे):- कोरोना महाभयंकर विषाणूने सर्व जगाची बाजारपेठ मोडकळीस आली आहे. माणूस कोरोना काळातच जगायला शिकला, हे सामान्य माणसांनी मान्य केले आहे.याच काळात जगणे मुश्किल झाले असताना जगण्याची उर्मी समाजमनात देत,समाजाला आपण काही देणे लागतो,याच उदात्त भावनेने शिरभावी  ता-सांगोला येथील दादासो अनंत जगदाळे यांनी आपली लाडकी कन्या कुमारी अवंती हिच्या १७  व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिशय गरीब कुटुंबातील,आणि ज्या मुलींच्या पित्याचे निधन  कोरोना काळात झालेले आहे, आणि परिस्थिती नाजूक आहे,अशा दोन मुलींचे विवाह दिनांक ५  मार्च २०२२  रोजी लावून कन्यादान करून देण्याचा संकल्प केला आहे.या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा विवाह सोहळा ४  मार्च रोजी शिरभावी येथील भवानगिरी महाराज मंदिरात संपन्न होणार आहे.विवाह लावून देण्यात येणाऱ्या दोन मुलींना दादासो जगदाळे यांच्याकडून संसारोपयोगी साहित्य संच, मनीमंगळसूत्र ,कपडे,तसेच दोन्हीकडील  ५०/५०  पाहुण्यांसाठी भोजनाची सोय केली जाणार आहे. सदर विवाह सोहळ्याची नावनोंदणी २५  फेब्रुवारी पर्यत करावे, असे आवाहन राजमाता जिजाऊ फाउंडेशन च्या अध्यक्षा पल्लवी कांबळे यांनी केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी दादासो जगदाळे-८२०८१५११८१ ,अंतेश काळे-८२०८०५०१३७ ,समाधान सलगर-९८२३६०५१२६ ,राजकुमार ताटे-- ९८८१०८६२९२  या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. ज्या मुलींची नावे निवडली जातील,त्यांना २६  फेब्रुवारी पर्यत कळविले जातील,असे ही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सध्याच्या काळात लाखो रुपये खर्च करून वाढदिवस साजरे केले जातात.परंतु समाजाला आदर्श ठरतील असा विधायक उपक्रम हाती घेतला आहे. केवळ वाढदिवसानिमित्त समाजाला विधायक दिशा मिळावी,ही अपेक्षा आहे. मुलींच्या जन्माचे स्वागतही या निमित्ताने झाले पाहिजे ,हाच मानस आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages