सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे स्कॉलरशिप परीक्षेत दैदिप्यमान यश
चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर ५२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 38 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत सांगोला विद्यामंदिरच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.यानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते या गुणी विद्यार्थ्यांचा पालकासमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं.घोंगडे, प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जागळे,पर्यवेक्षक बिभीषण माने, पोपटराव केदार, अजय बारबोले उपस्थित होते.
इयत्ता पाचवी मधून 1)कुमारी घाडगे जिज्ञासा तानाजी या विद्यार्थीनीने 282 गुण मिळवत राज्यस्तरावर सहावा तर जिल्हास्तरावर पहिला क्रमांक मिळविला . 2) कुमार लवांडे सोहम दिलीप जिल्ह्यात 10 वा 3) कुमार करांडे मयंक लालासो जिल्ह्यात 16 वा 4) कुमार शिंत्रे सुधांशू सुशांत जिल्ह्यात 17 वा 5) कुमार बुरुंगले सार्थक सुभाष जिल्ह्यात 56 वा 6)कुमार तेली श्रेयस नागेश जिल्ह्यात 70 वा 7) कुमारी चौगुले सानिका राजू जिल्ह्यात 72 वी 8)कुमारी कदम भक्ती भारत जिल्ह्यात 91 वी 9) कुमार माने अथर्व लक्ष्मण जिल्ह्यात 93 वी 10)कुमार खटकाळे अथर्व रुपेश जिल्ह्यात 100 वा 11)कुमार गाडे अभिनंदन बाहुबली जिल्ह्यात 166 वा 12) कुमारी काशीद अस्मिता सुकदेव जिल्ह्यात 172 वी 13) कुमारी आलदर शामल महेश जिल्ह्यात 175 वी 14) कुमारी ननवरे अनुराधा मारुती जिल्ह्यात 180 वी 15)कुमार नलवडे प्रतीक अमोल जिल्ह्यात 198 वा 16)कुमार सावंत अर्जुन बापुसो जिल्ह्यात 201 वा 17)कुमार सावंत तेजस तानाजी जिल्ह्यात 206 वा 18) कुमार जाधव विश्वजीत अर्जुन जिल्ह्यात 207 वा सदर 18 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले.
तसेच तसेच इयत्ता आठवी मधून 1) कुमारी पवार प्रेरणा संभाजी राज्यात 6 वी जिल्ह्यात 1ली 2) कुमारी पाटील सानिका तानाजी राज्यात 9वी जिल्ह्यात 4 थी 3) कुमार कुलकर्णी सोहम श्रीपाद राज्यात 15 वा जिल्ह्यात 9वा 4)कुमार इंगोले साहिल शहाजीराव जिल्ह्यात 13वा, 5) कुमारी माने साक्षी लक्ष्मण जिल्ह्यात 17 वी, 6) माने कोमल अंकुश जिल्ह्यात 18 वी, 7) कुमारी स्वामी संस्कृती विवेकानंद जिल्हा 19वी , 8) कुमारी वाघमारे गौरी रमेश जिल्हा 20वी , 9) कुमार जगताप हर्षराज शामराव जिल्हा 27 वा, 10)कुमारी बाबर प्राची बापूसाहेब जिल्ह्यात 32वी , 11)कुमारी गोरे स्मिता सिद्धनाथ जिल्ह्यात 37 वी , 12)कुमार औताडे शुभम शशिकांत जिल्ह्यात 39 वा, १3)कुमारी सुरवसे मानसी मधुकर जिल्ह्यात 40 वी,14)कुमार कांबळे निकिता बाळू जिल्ह्यात 43वी, 15)कुमारी बनकर तनुजा संजय जिल्ह्यात 49 वी, 16)कुमारी जवंजाळ सोनल मकरंद जिल्ह्यात 51 वी, 17)कुमारी उकळे प्रतिभा श्रीशैल्य जिह्यात 72 वी, 18)कुमारी नवले आर्या अनिल जिल्ह्यात 76 वी,19)कुमार चवरे प्रणव पोपट जिल्ह्यात 78वी ,20)कुमार खांडेकर अनिकेत जगन्नाथ जिल्हात 89 वा, 21) कुमारी पवार कृतिका संजय जिल्ह्यात 92वी ,22) कुमार कबाडे ऋतुराज बाबासो जिल्ह्यात 99 वा,23) कुमार घाडगे सार्थक रमेश जिल्ह्यात 102 वा,24) कुमार नवले सोहम सुभाष जिल्ह्यात 109 वा, 25) कुमारी इंगोले काजल आप्पासो 127 वी,26) कुमार दिघे आदित्य शंकर जिल्ह्यात 129वा,27) कुमार कोरे सोहम विकास जिल्ह्यात 133 वा, 28) कुमार शिंदे मेहुल महेश जिल्ह्यात 154 वा, 29) कुमार तोडकरी अथर्व अविनाश जिल्ह्यात 156 वा, 30) कुमार बदडे आशुतोष दत्तात्रय जिल्ह्यात 161 वा, 31) कुमार पाटकूलकर अथर्व सचिन जिल्ह्यात 162 वा,32) कुमार पवार संकेत तानाजी जिल्ह्यात 168 वा,33) कुमार घुले उत्कर्ष नवनाथ जिल्ह्यात 182 वा,34) कुमारी कबाडे वृशाली सुभाष जिल्ह्यात 184 वी, 35) कुमारी उंडाळे श्रेया राजेंद्र जिल्ह्यात 197 वी, 36) कुमारी इरकर ऋतुजा वामन जिल्ह्यात 212 वी,37) कुमारी रोडगे वैभवी राजकुमार जिल्ह्यात 214 वी, 38) कुमार जुंदळे अभिजीत सुरेश जिल्ह्यात 218 वा क्रमांक पटकावला वरील सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा, पालकांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.सदर सत्कार समारंभामध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांचेकडून प्रत्येकी रोख २ हजार रुपये व प्रा. नानासाहेब साळुंखे लिखित शाहूंची आठवण हे पुस्तक भेट देण्यात आले.
इयत्ता पाचवी मधील राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या जिज्ञासा घाडगे या विद्यार्थिनी पर्यवेक्षक अजय बारबोले यांचेकडून रोख रुपये पाचशे तसेच इयत्ता आठवी राज्य इयत्ता आठवी मधील राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या तीन विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक पोपट केदार यांचेकडून बाराशे रुपये बक्षीस देण्यात आले. इयत्ता पाचवीमध्ये गणित विषया मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवलेल्या जिज्ञासा घाडगे या विद्यार्थिनी गणित विषय शिक्षक नागेश पाटील यांचे कडून पाचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच इयत्ता आठवी मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयांमध्ये १५० पैकी १५० गुण मिळवलेल्या कुमारी प्रेरणा पवार या विद्यार्थिनीस रमेश बिले, शुभांगी पलसे, भाग्यश्री मिरजे यांचेकडून रोख पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले.
वरील यशस्वी विद्यार्थ्यांना पाचवी स्कॉलरशिप विभाग प्रमुख पाटील,जंगम,कांबळे,पाटील कुमारी मुलानी कुमारी जाधव तसेच इयत्ता आठवी साठी स्कॉलरशिप विभाग प्रमुख बिले,धुकटे,नष्टे, कुमारी कुंभार कुमारी पलसे कुमारी मिरजे तसेच शाळा बाह्य विभाग प्रमुख नामदेव खंडागळे व संस्था बाह्य परीक्षा विभाग प्रमुख शिवाजी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक भीमाशंकर पैलवान यांनी केले. इयत्ता पाचवी गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी यादी वाचन चैतन्य कांबळे यांनी तर इयत्ता आठवी गुणवंत विद्यार्थी यादी वाचन प्रदीप धुकटे यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पालकांनी प्रशाले बद्दल व शिक्षकांबद्दल कौतुक करून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष नष्टे यांनी तर आभार प्रदर्शन कु पलसे यांनी व्यक्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, संस्थासचिव म .शं .घोंगडे ,संस्था सहसचिव प्रबुध्दचंद्र झपके,संस्था खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके , सर्व संस्था कार्यकारणी सदस्य, मुख्याध्यापक भी.म. पैलवान ,उपप्राचार्य ग. ना.घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे , पर्यवेक्षक बिभीषण माने, पोपटराव केदार, अजय बारबोले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
इयत्ता पाचवी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले उत्तुंग यश विद्यामंदिच्या गुणवत्तेतील नावलौकिकात भर घालणारे आहे आपण समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी व आपण ही अशा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करावे ..
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
0 Comments