सांगोला नगरपरिषदेमार्फत सांगोला विद्यामंदिर येथे "चित्रकला" स्पर्धेचे आयोजन
स्वच्छ सर्वेक्षण,माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्तुत्य उपक्रम
(500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग)
सांगोला (कटूसत्य वृत्त):- पर्यावरण समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जल,पृथ्वी,आकाश,अग्नी,वायू या पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा 2.0 तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2022 या दोन्ही अभियानात सांगोला नगरपरिषद सहभागी झाली आहे.या अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी तसेच शहराच्या स्वच्छते करिता नगरपरिषदे मार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन,स्वच्छता इत्यादी बाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपरिषदेमार्फत संगोला विद्यामंदिर येथे पर्यावरण,स्वच्छता संबंधित विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
लहान मुलं, मुली हे उद्याच्या नवीन पिढीचे शिलेदार व देशाचं भविष्य आहेत ही बाब ओळखून त्यांना वृक्षारोपणाचे महत्व,वसुंधरेचे जतन,हवा प्रदूषण,पर्यावरणीय ऱ्हास,शौचालय वापर,स्वच्छतेचे महत्व या गोष्टींबाबत माहिती मिळावी व त्याच्यात जबाबदारी ची भावना निर्माण व्हावी या उद्देशातुन सांगोला नगरपरिषदेमार्फत सांगोला विद्यामंदिर शाळेत ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली.सदर चित्रकला स्पर्धेमध्ये सुमारे 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून अप्रतिम,सुरेख चित्र साकारली.
स्पर्धेची सुरुवात पर्यावरण पूरक हरित शपथ देऊन करण्यात आली यावेळी विद्यामंदिर प्रशालाचे मुख्याध्यापक पहिलवान व सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड, शहर समन्वयक शिवाजी सांगळे, नोडल ऑफिसर स्वप्निल हाके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, स्वच्छता सहाय्यक प्रशांत बनसोडे निकोप ठोकळे, सिद्धेश्वर बनसोडे यांनी केले.
इतक्या लहान वयोगटातील विध्यार्थ्यांनी रेखाटलेली पर्यावरण रक्षण,स्वच्छतेचा संदेश देणारी इतकी सुंदर,अप्रतिम चित्र खरच कौतुकास्पद आहेत.अशा स्पर्धांच्या माध्यमातून माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण ही अभियाने सांगोला शहरातील घराघरात पोहचून या अभियानांना लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होण्यास मोठा हातभार लागेल.
कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद
मुख्याधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रकला स्पर्धांचे नियोजन करून त्या सांगोला विद्यामंदिर चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वी केल्या. स्पर्धेदरम्यान लहान विध्यार्थ्यांचा उत्साह व चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
स्वप्नील हाके
नोडल अधिकारी, माझी वसुंधरा अभियान
नगरपरिषदेच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देऊन या चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून लहान विध्यार्थ्यांनी दिलेला पर्यावरण व स्वच्छता संदेश दिला आपना सर्वांसाठी च दिशा दर्शक आहे.
शिवाजी सांगळे
नोडल अधिकारी, स्वच्छ भारत अभियान
0 Comments