Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर सिद्धेश्वर यात्रेविषयी अद्याप कोणताच निर्णय नाही

 सोलापूर सिद्धेश्वर यात्रेविषयी अद्याप कोणताच निर्णय नाही


आ. विजयकुमार देशमुख व महापौर यन्नम यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे, मात्र राज्य शासनाचा कोणताही निर्णय झाला नाही, धार्मिक विधी काही दिवसात सुरू होणार आहेत, मानकरी हिरेहब्बू यांनी मात्र सर्व नंदीध्वज सह सर्वधार्मिक विधीला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख व महापौर श्रीकांचना यन्नम, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सभागृह नेता शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. सिद्धेश्वर यात्रा संदर्भात लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे धार्मिक विधींना परवानगी द्यावी नंदीध्वज मिरवणूक नको अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने शंभरकर यांच्याकडे केली.



Reactions

Post a Comment

0 Comments