पतंग उडविण्यासाठी वापरु नका नायलॉनचा मांजा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नायलॉन मांजामुळे दुखापत, जिवितहानीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तरीही, महाराष्ट्रात नायलॉन मांजा वापरण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार नायलॉन मांजा, प्लास्टिक अथवा तशा कृत्रिम पदार्थापासून बनवलेला मांजा, ज्यामुळे पक्षांना अथवा माणसांना धोका होईल, अशा मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर करता येणार नाही. तसेच अशा धाग्यांची निर्मिती, विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशाठिकाणी पतंग उडवू नये, कोणत्याही ठिकाणी तशा स्पर्धा आयोजित करू नयेत, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी केले आहे. अन्यथा, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0 Comments