Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्या... - संभाजी ब्रिगेड

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्या... - संभाजी ब्रिगेड






पुणे (कटूसत्य वृत्त):- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याच खऱ्या विद्येची देवता आहेत. त्यांच्यामुळे आज स्त्री शिकली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली. म्हणूनच देशाची राष्ट्रपती होऊ शकली. प्रत्येक स्त्री आज स्वतःच्या पायावर स्वतःचं कर्तुत्व निर्माण करत आहे. स्त्रीला प्रेरणा देणार्‍या त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर प्रत्येकाच्या घराघरांमध्ये झाला पाहिजे. जिजाऊ, सावित्री, अहिल्या यांचा प्रत्येक घरामध्ये त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. तसेच 'राज्य सरकारने सावित्री ते जिजाऊ सन्मान दिन...' म्हणून साजरा केला त्याबद्दल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे मराठा सेवा संघाच्या वतीने अभिनंदन... मराठा सेवा संघाच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून सावित्री-जिजाऊ दस रात्र महोत्सव साजरा करण्यात येत होता तो आज शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर साजरा होईल याचा मनस्वी आनंद आनंद आहे असे मत मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष इंजिनीयर राजू डुबल यांनी व्यक्त केले फुले दांपत्याला भारतरत्न द्या... कठीण परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी रोजी शाळा सुरू केली. त्याच भिडे वाड्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. 'भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे...' अशी सर्व समाजाची इच्छा असतानासुद्धा राज्य सरकार सदर जागेवर तोडगा काढत नाही. तात्काळ त्या जागेवर राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. तसेच 'क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे.' महाराष्ट्रात फुले दाम्पत्याची उपेक्षा होत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे भारतरत्नसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त करत आहे. फुले दांपत्याला भारतरत्न मिळणे हा त्यांचा हक्क आहे. असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्या वतीने महात्मा फुले वाडा गंज पेठ येथे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजू डुबल, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष रघुवीर तुपे, सचिव महेश घाडगे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली रमाने, शोभा जाधव, सुरेखा जुजगर, संजय चव्हाण, अनिल माने, दत्तात्रय खुटवड, गणेश राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, पुणे.

Reactions

Post a Comment

0 Comments