कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपुर्वी सीईओ स्वामी यांनी घेतली आढावा बैठक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ओमायक्रॉन व्हेरिएन्ट व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांचा आढावा घेतला. मुंबई व पुणे या शहरात वाढणारी रूग्ण संख्या व त्या अनुषंगाने शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या सुचना त्यानुसार खालील मुद्यांवर चर्चा करून सुचना देण्यात आल्या.
1) मनुष्यबळ व्यवस्थापन.
आपल्याकडे असणारे मनुष्यबळ लसीकरण व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना यासाठी व्यवस्थीत नियोजन करावे. कामाचा व्याप व मनुष्यबळ याची माहिती तालूकास्तरावरून तात्काळ देणे जेणेकरून शासनास कंत्राटी मनुष्यबळाबाबत कळविणे शक्य होईल.
2) DCH DCHC CCC बेड उपलब्धता करून घेणे याकामी जर काही अडचणी असतील तर तातडीने जिल्हास्तरावर कळवाव्यात. दुसऱ्या लाटेमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने "गाव तिथे कोविड सेंटर" हे अभियान पुन्हा सुरू करण्यात यावे. गावातच कोरोनाच्या चाचण्या व विलगीकरण केंद्र स्थापन कराव्यात.
3) ऑक्सीजन उपलब्धता पूर्वतयारी.
यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव, कोंडी व पुरंदावडे या ठिकाणी लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टॅंक उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात 37 प्राथमिक आरोग्य केंद्रात 325 क्रायोजेनीक ऑक्सिजन सिलेंडर व 630 जंबो सिलेंडरद्वारे 186 बेडला पाईप लाईन द्वारे ऑक्सिजनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी यांचा वापर करणा्याबाबत माहिती करून घ्यावी.
4) औषधे व इतर साधन सामग्री सज्जता.
5) अंबुलन्स व रेफरल ट्रान्सपोर्ट.
6) टेस्टिंग ट्रेसिंग ट्रीटमेंट सज्जता.
7) प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सध्या किती ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे त्यातील किती सुरु आहेत व किती दुरुस्त करावे लागणार आहेत याची माहिती तात्काळ द्यावी.
8) चाईल्ड बेडची व्यवस्था करण्याबाबत यावेळी सुचना देण्यात आल्या.
9) कोविडचे नियम पाळण्याबाबत जनजागृती, दंड करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
10) कोविड साथीच्या अनुषंगाने निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे.
11) तालुका स्तरावर कोविड उपाययोजना संदर्भात नोडल अधिकारी नेमण्यात यावा.
12) तालुकास्तरावर कोविड वॉररुम स्थापन करणे.
13) यावेळी जनसंजीवनी अभियानाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदिप ढेले, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद उपस्थित होते.
0 Comments