Hot Posts

6/recent/ticker-posts

आंतरभारती विद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

 आंतरभारती विद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न


माढा (कटूसत्य वृत्त):-आंतरभारती विद्यालय कुर्डूवाडी येथे  तब्बल 1993- 94 च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा आंतरभारती शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी उजाळा दिला प्रसंगी दिवंगत माजी विद्यार्थी व शिक्षक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या आठवणी सांगितल्या. याप्रसंगी सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी भावुक झाले होते
दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचा माजी विद्यार्थी श्रीनिवास मोहिते यांनी केले शाळेच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या तर काही गमतीशीर प्रसंगाचे वर्णन सांगतांना प्रचंड हशा पिकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शाळेचे मुख्याध्यापक  काळे  तर प्रमुख अतिथी आंतरभारती संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल भाऊ सुराणा होते तसेच संस्थेचे सचिव प्रकाश शहा संचालक हरिभाऊ साळुंखे महादेव बापू डिकोळे व तत्कालीन सर्व माजी शिक्षक उपस्थित होते याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे आपली मनोगते व्यक्त केली तर शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगत विध्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी पन्नालाल सुराणा यांनी शाळेच्या उन्नतीसाठी मदत करण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची माजी विद्यार्थिनी समता दळवी कोंढारे यांनी व श्रीनिवास मोहिते यांनी केले.आभार प्रदर्शन सोनाली मोहिते यांनी केले अत्यंत उत्साहात पार पडलेला हा स्नेहमेळावा सर्वांनाच एक चिरस्थायी आठवण देऊन गेला. याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेस हार्मोनियम तबला व इतर संगीत साहित्य भेट म्हणून दिले



Reactions

Post a Comment

0 Comments