माढ्यात ४ उमेदवारांची माघार,४ जागेसाठी १३ उमेदवार रिंगणात,माढ्यातील नितीन साठे,पृथ्वीराज चवरे
दौलतराव साठे तिघे तरुण पहिल्यांदाच उतरले राजकारणात
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग ५,७,९,१४ या उर्वरित ४ जागेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या सोमवारच्या दिवशी ३ तर मागील दोन दिवसांपुर्वी १ अश्या एकुण ४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले.त्यामुळे ४ जागेसाठी आता १३ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उभे आहेत.
अर्ज माघार घेण्याच्या दिवशी उमेदवारांना घेऊन नेते मंडळी नगरपंचायत कार्यालयासमोर आल्याचे दिसुन आले.महाविकास आघाडीतील शिवसेना,काॅग्रेस,राष्ट्रवादी( काॅग्रेस) या ३ घटक पक्षांच्या परस्पर विरोधातच निवडणुक होणार आहे. निवडणुक अधिकारी ज्योती कदम व मुख्याधिकारी चरण कोल्हे निवडणुक प्रकिया यशस्वी पणे पार पाडत आहेत. गत निवडणुकीत प्रभाग ५ व १४ दादासाहेब साठे गटाकडे तर प्रभाग ७ व ९ राष्ट्रवादीच्या झुंजार भांगे गटाकडे राहिले होते.
प्रभाग पाच मध्ये महात्मा फुले प्रतिष्ठान चे अध्यक्ष अजिनाथ राऊत यांच्या पत्नी सुनिता राऊत या(काॅग्रेस आय),तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद साठे यांच्या पत्नी योजना साठे(अपक्ष) अशी दुरंगी तर प्रभाग ७ मध्ये अर्चना महेश चवरे(काॅग्रेस),माजी जि.प.सदस्य आनंदराव कानडे यांच्या पत्नी अर्चना कानडे(शिवसेना),श्रीमंतराजे प्रतिष्ठानचे सचिन चवरे यांच्या पत्नी संजना चवरे(राष्ट्रवादी) अशी तिरंगी लढत होत आहे.प्रभाग १४ मध्ये रोहित निलंकठ पवार(शिवसेना),
युवक काॅग्रेस चे अध्यक्ष नितिन हणुमंत साठे(काॅग्रेस),योगेश बबनराव पवार(राष्ट्रवादी),दौलतराव दत्तात्रय साठे(अपक्ष),दिनेश गोपिनाथ जगदाळे(अपक्ष) अशी ५ उमेदवारा मध्ये लढत होईल.प्रभाग ९ मध्ये माजी नगरसेवक. चंद्रशेखर रंगनाथ गोटे हे दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीसाठी याच प्रभागातून राष्ट्रवादी तुन,उद्योजक शैलेश कुर्डे यांच्या पत्नी स्नेहश्री कुर्डे(काॅग्रेस),जिल्हा दुध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांचे पुत्र
पृथ्वीराज चवरे(शिवसेना) या तिघात लढत होईल.
विशेष म्हणजे या ४ जागांच्या निवडणुकीसाठी विशेष महत्व प्राप्त झाले असुन माढ्याच्या सत्ता स्थापनेसाठी या चार जागा महत्वाची भुमिका बजावणार आहेत.या निकालावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.तिन्हीही पक्षांच्या पॅनल प्रमुखांनी चारही जागांची निवडणुक प्रतिष्टेची झाली आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्याची नावे-केशरबाई दिलीप राऊत(प्रभाग ७),शोभा समाधान राऊत(प्रभाग ५),पल्लवी सुमतीलाल साबळे(प्रभाग ९),महेश अरूण भांगे(प्रभाग १४)
तिघे तरुण प्रथमच राजकारणात -
माढ्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या दुसर्या टर्म साठी
तिघे तरुण राजकारणात प्रथमच उतरले आहेत.एमबीएचे शिक्षण घेत असलेले २६ वर्षीय पृथ्वीराज राजेंद्र चवरे ९ मधुन शिवसेनेकडुन तसेच ३० वर्षीय युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नितीन साठे १४ मधुन काॅग्रेस कडुन तर २९ वर्षीय दौलतराव साठे अपक्ष म्हणून १४ मध्ये उमेदवारी आहे.तिघा तरुणांपैकी पहिल्या राजकिय इनिंग मध्ये नगरसेवक पदाची संधी कोणाला मिळणार ? हे येणारा राजकीय काळच दाखवुन देईल.
No comments:
Post a Comment