सांगोला येथे सुपरस्टार सर्कसला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरोच्या काळात शासनाकडून कसलीही मदत मिळाली नाही-सर्कस मालक महादेव माने
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला मिरज रोड येथे असलेल्या सुपरस्टार सर्कसला सांगोला शहरासह ग्रामीण भागातून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सर्कस मधील अनेक आकर्षक कसरती मुळे दररोज तीन खेळ हाऊसफुल सुरू असल्याची माहिती संघाचे मालक महादेव माने आणि व्यवस्थापक ज्वाला सिंग यांनी दिली.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडॉउन मुळे बंद असलेली सर्कस जवळपास दोन वर्षानी सुरू झाली आहे. सर्कस मध्ये असणाऱ्या कलाकारांना काही काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.सर्व कलाकारांनी मागणी केलेनी सांगोला शहरापासून सर्कस पुन्हा सुरू करण्यात आली आहे.त्याला सांगोलाकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे .सर्कस मध्ये जवळपास 100 हून अधिक कलाकार आहेत. त्यामध्ये महिला कलाकारांची काम उल्लेखनीय आहे.यामध्ये प्लास्टिक बोलनेस,ग्रुप डान्स, मोटरसायकल बाईक ,आफ्रिकन बंबू ,एक चाकी सायकल, बोलनिस गर्ल्स, रिंग डाऊन, पॉकेट सायकल,बुटा जोकर यासह अनेक खेळ आहेत.
ही सर्कस संपूर्ण एक महिना सांगोला शहरात सुरू राहणार असून या सर्कशीचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. दररोज तीन खेळ होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक शो दोन तासाचा असणार आहे. सर्वात लहान जोकर बुटा जोकर जगातील सर्वात लहान जोकर म्हणून प्रसिद्ध आहे. बुटा जोकर सुपरस्टार सर्कस चा हिरो आहे लहान मुलांना असणारा बुटा जोकर लहान मुला बरोबर सेल्फी काढून त्यांना आनंद देत आहे.बुटा जोकर एक चाकी सायकल चालवून सगळ्यांचे मन जिंकून घेत आहे.
आजच सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. जवळपास 100 जणांना जगविण्याचे कार्य सर्कस मालक या नात्याने करीत आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन आम्ही करीत आहे. राज्यसरकारने आम्हांला भरीव निधीची तरतूद करावी,अशी अपेक्षा सर्कस मालक अविनाश माने यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment