वाढत्या चोऱ्यांना थांबवण्यासाठी तरुणाईचा जागता पहारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 10, 2022

वाढत्या चोऱ्यांना थांबवण्यासाठी तरुणाईचा जागता पहारा

 वाढत्या चोऱ्यांना थांबवण्यासाठी तरुणाईचा जागता पहारा

बार्शी (कटूसत्य वृत्त):- शहरातील सुभाष नगर, वाणी प्लॉट, कँसर हॉस्पिटल या भागात गेल्या काही महिन्यांपासून  चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील युवकांनी रात्रीचा जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आता तरुणाईनेच बाह्या सरसावल्याचे दिसून येते.
शहरातील 2 नंबर इंडस्ट्री इस्टेट परिसरात चोर आल्याची माहिती एका व्यक्तीने जागता पहारा करणाऱ्या काही युवकांना दिली. त्यांनंतर, #वाणी प्लॉट आणि पंकज नगर येथील तरुणांनी संबंधित ठिकाणी भेट देत परिसरातील नागरिकांना जागं केलं. या भागातील नागरिकांशी संवाद साधला. तसेच, आपला मोबाईल नंबरही दिला. या भागातील नगरसेवक कुंभार यांच्यासह  किशोर खेडकर, बप्पा व्हळे, सुरज खंदारे, पप्पू गिरी, मौला पठाण यांसह इतर तरुणमित्रही गस्तवर होते. हे सर्व युवक परिसरात रात्रीची गस्त घालत होते. वाणी प्लॉट, सुभाष नगर,कॅन्सर हॉस्पिटल, पंकज नगर भागातील तरुणांनी आपले ग्रुप बनवले असून ते रात्री एकमेकांच्या संपर्कात असतात.
दरम्यान, जवळपास 10 महिने उलटून गेले आहेत. अद्यपही चोरट्यांचा तपास लागला नाही. त्यामुळेच, चोरटे पुन्हा धाडसी चोरी करत आहेत. 8 दिवसांपूर्वी वाणी प्लॉट येथील भगवंत कॉलनी येथे चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. त्यामुळे, पुन्हा नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढवली आहे, तरी स्थानिक युवक आणि रहिवाशी नागरिकही आता स्वतः पुढे सरसावले आहेत. चोरट्यांचा मुसक्या अवळण्यासाठी आता माझी गल्ली, माझी जबाबदारी हाच उपक्रम दिसून येत आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages