Hot Posts

6/recent/ticker-posts

वेताळवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मारुती सुरवसे यांची निवड

 वेताळवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मारुती सुरवसे यांची निवड



     माढा (कटूसत्य वृत्त):- जि.प.शाळा वेताळवाडी  येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.

  सदर समितीच्या अध्यक्षपदी मारुती दादा सुरवसे तर उपाध्यक्षपदी राधा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षण प्रेमी व दिव्यांग प्रतिनिधी म्हणून रामेश्वर लोंढे यांची तर ग्रामपंचायत सदस्यातून अश्विनी जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

    इतर सदस्यांमध्ये संजय खोत  राहूल सुरवसे दादा खोत भाऊ खोत निवेदिता सुरवसे शितल सुरवसे स्वाती बचुटे सुनिता खोत उषा खोत पूजा इजगज यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब डांगे व सचिव म्हणून मुख्याध्यापक  मुकुंद तांबिले यांची निवड करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सोनाश्री राऊत व विकास नायकुडे यांची निवड केली. एकूण 18सदस्य निवडण्यात आले.

    सदर प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजेश आप्पा खोत प्रा.रवि सुरवसे शा.व्य.समिती अध्यक्ष  सोमनाथ बचुटे शहाजी नाना सुरवसे बापू सुरवसे शरद सुरवसे सुधीर नाना सुरवसे व शाळेतील शिक्षक मनोज देशमुख  रमेश तांबिले दिनेशकुमार साळुंके व पालक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments