Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उमेश केदार यांची बिनविरोध निवड

 शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उमेश केदार यांची बिनविरोध निवड  




माढा (कटूसत्य वृत्त):- जि.प.शाळा केदारवस्ती (उपळाई खु ) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उमेश केदार  व उपाध्यक्षपदी सुनिल गोरे यांची निवड करण्यात आली.ही शाळा  गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विविध सहशालेय उपक्रम अग्रेसर असते .स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभाग नोंदवल्यामुळे भारत फोर्ज लि,पुणे यांच्याकडून गौरवण्यात आले आहे.याबद्दल मुख्याध्यापक अर्जुन गवळी व शिक्षिका प्रतिभा नवले यांचे पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी पालक व ग्रामस्थ नेहमीच लोकसहभागातून मदत करीत असतात. जि.प.शाळा केदारवस्ती येथे शाळा विकास हाच मुख्य उद्देश ठेऊन अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व सदस्य  यांची निवड नेहमीप्रमाणे बिनविरोध करुन एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.या समितीचे सदस्य म्हणून सचिन केदार अमोल केदार ज्योती रणदिवे राणी कदम वर्षा माळी दत्ताञय केदार धनाजी हराळे पल्लवी केदार शिक्षण प्रेमी मोहन गाडे ,तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वैभवी भांगे वैष्णवी गोरे ,यांची निवड करण्यात आली. यावेळी सुनिता गोरे अंकुश गोरे सखुबाई कदम मुख्याध्यापक अर्जुन गवळी शिक्षिका प्रतिभा नवले व पालक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments